आधी ab फॉर्म चोरल्याचा आरोप केला, पण आता मुंबई महापालिकेतील 173 क्रमांकाच्या वार्डमध्ये भाजपचा वेगळाच गेम

Mumbai muncipal corporation : मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 173 मधून दत्ता केळुसकर यांच्या पत्नी शिल्पा केळुसकर यांना भाजपची अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच उमेदवार शिवसेना विरोधात मुंबईत लढणार असल्याचं चित्र आहे.

Mumbai muncipal corporation

Mumbai muncipal corporation

मुंबई तक

04 Jan 2026 (अपडेटेड: 04 Jan 2026, 07:40 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिल्पा केळुसकर यांना भाजपच्या अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर

point

केळुसकर शिंदेच्या शिवसेना विरुद्ध लढणार? 

Mumbai Muncipal Corporation : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महापालिकांच्या उमेदवारांबाबत मोठी उलटफेर दिसून येते. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 173 मधून दत्ता केळुसकर यांच्याऐवजी शिल्पा केळुसकर यांना भाजपच्या अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हाच उमेदवार शिवसेना विरोधात मुंबईत लढणार असल्याचं चित्र आहे. याच उमेदवारावर एबी फर्म चोरीचा देखील आरोप करण्यात आल्याचे वृत्त आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : कोल्हापूर हादरलं! आईवरून शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या मित्राचा दगडाने ठेचून केला खून

निवडणूक आयोगाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात शिल्पा केळुसकर यांना अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. केळुसकर यांना भाजपच्या कमळ चिन्हावरून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

केळुसकर शिंदेच्या शिवसेना विरुद्ध लढणार? 

केळुसकर या वॉर्ड क्रमांक 173 मधून शिंदेच्या शिवसेना विरुद्ध लढणार आहेत. दरम्यान, याला एक नवीन वळण प्राप्त झालं आहे. दत्ता केळुसकर यांनी भाजपचा एबी फॉर्म चोरल्याचं सांगण्यात येत होतं. याच कारणावरून त्यांच्यावर मुंबई भाजपकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण आता या निवडणुकीत दत्ता केळुसकर आणि शिल्पा केळुसकर यांच्या पाठीशी भाजप पक्ष उभा राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत अत्ताच भाष्य करता येणार नाही.

हे ही वाचा : 'बडोद्यात सगळे महापौर हे गुजराती का होतात? मुंबईत मराठीच महापौर', राज ठाकरेंचा भाजपला करडा सवाल अन्...

दरम्यान, या निवडणुकीला काही दिवसच उरले आहेत. मात्र, याच उरलेल्या दिवसांमध्ये काहीही होऊ शकते अशी संभावना आहे. कारण इतर महापालिकांमध्ये काही उमेदवारांनी एबी फॉर्म मागे घेतले आहेत. तर नुकताच वरळीतील काही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे.  

    follow whatsapp