Kalyan Dombivali Election : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत आज 2 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अशातच राजकीय उलटफेर चित्र बघायला मिळालं होतं. ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने कल्याण- डोंबिवली महापालिकेवर महायुतीचीच सत्ता येण्याची चिन्हे आता हळू हळू स्पष्ट होऊ लागली आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'पनवेलमध्ये पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकली', शेकाप माजी आमदार बाळाराम पाटील संतापले
निवडणुकीपूर्वी महायुतीचे 20 नगरसेवक निवडून आले
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे एकूण 6 तर दुसरीकडे भाजपचे 14 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. अशातच महायुतीचे एकूण 20 नगरसेवक आधीच निवडून आले आहेत. तसेच याचमुळे महायुतीचाच महापौर बसणार, असा दावा देखील सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.
तसेच विविध विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सत्ताधाऱ्यांनी महायुतीला थेट फायदा झाला होता. दरम्यान, आतापर्यंत मनसे 5, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 6, काँग्रेस 3 उमेदवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे अनेक प्रभागांमध्ये भाजप आणि शिवसेनाचे 20 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अशातच आता बिनविरोध निवडून आलेल्यांची यादी आता समोर आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवारांचे नाव आणि त्यांच्यासमोर उभे असलेले विरोधी पक्षाचे उमेदवारांचे नाव ज्यांनी निवडणुकीतून माघार घेतला....
भारतीय जनता पार्टी.....
1 - पॅनल क्र. 18 अ
रेखा राजन चौधरी ( भाजप उमेदवार ) बिनविरोध विजयी
या ठिकाणी एकही उमेदवारांनी अर्ज दाखल नाही केला होता...
2 - पॅनल क्र. 26 क
आसावरी नवरे ( भाजप उमेदवार ) बिनविरोध विजयी
या ठिकाणी एकही उमेदवारांनी अर्ज दाखल नाही केला होता...
3 - पॅनल क्र. 26 ब
रंजना मितेश पेणकर ( भाजप उमेदवार ) बिनविरोध विजयी
गायत्री उल्हास गवांदे ( अपक्ष) माघार
रंजना मितेश पेणकर ( भाजप उमेदवार ) माघार
4 - पॅनल क्र. 26 अ
मंदा पाटील ( भाजप उमेदवार ) बिनविरोध विजयी
ॲड. सुवर्णा संजय पाटील-म्हात्रे ( मनसे ) माघार
5 - पॅनल क्र. 24 ब
ज्योती पवन पाटील ( भाजप उमेदवार ) बिनविरोध विजयी
डॉ मंजु विनय पाटील ( काँग्रेस ) माघार
श्रुती शाम चौगले ( ठाकरे गट ) माघार
चैताली पाटील ( भाजप ) माघार
6 - पॅनल क्र. 26 अ
मुकुंद पेडणेकर ( भाजप ) बिनविरोध विजयी
राहुल बाळाराम भगत ( ठाकरे गट ) माघार
7 - पॅनल क्र. 27 ड
महेश बाबुराव पाटील ( भाजप ) बिनविरोध विजयी
मनोज प्रकाश घरत ( मनसे , शहराध्यक्ष ) माघार
8 - पॅनल क्र. 19 क
साई शिवाजी शेलार ( भाजप ) बिनविरोध विजयी
दीपक भोसले ( अपक्ष ) माघार
सूर्यकांत माळकर ( अपक्ष ) माघार
कुंदन अनंत काळण ( ठाकरे गट ) माघार
9 - पॅनल क्र. 23 क
हर्षदा हृदयनाथ भोईर ( भाजप ) बिनविरोध विजयी
वनिता भगवान म्हात्रे ( NCP ) माघार
अनिता प्रशांत तिकडे ( वंचित बहुजन आघाडी ) माघार
10 - पॅनल क्र. 23 ड
जयेश म्हात्रे ( भाजप ) बिनविरोध विजयी
शशिकांत सुरेश म्हात्रे ( NCP) माघार
लक्ष्मण प्रल्हाद अंभोरे ( काँग्रेस ) माघार
पंचफुला निवृत्ती शेळके ( RPI ) माघार
निलेश प्रभाकर मोर ( अपक्ष ) माघार
11 - पॅनल क्र. 23
दीपेश म्हात्रे ( भाजप ) बिनविरोध विजयी
धीरेंद्र चंद्रकांत भोईर ( ठाकरे गट ) माघार
12 - पॅनल क्र. 30 अ
रविना अमर माळी ( भाजप ) बिनविरोध विजयी
वैशाली योगेश पाटील ( अपक्ष ) माघार
पूजा विकास देसले ( अपक्ष ) माघार
प्रणाली ब्रह्मा माळी ( NCP ) माघार
पुनम अंकलेश माळी ( NCP ) माघार
प्रीती नितीन माळी ( अपक्ष ) माघार
प्रेमा प्रकाश म्हात्रे ( अपक्ष ) माघार
पूर्व गोपीचंद पाटील ( अपक्ष ) माघार
लक्ष्मीप्रसाधर माली ( अपक्ष ) माघार
13 - पॅनल क्र. 19 अ
पूजा योगेश म्हात्रे ( भाजप ) बिनविरोध विजयी
पूजा चौधरी ( अपक्ष ) माघार
शितल नंदकिशोर ठोसर ( ठाकरे गट ) माघार
14 - पॅनल क्र. 19 ब
डॉ सुनीता पाटील ( भाजप ) बिनविरोध विजयी
काजल जयंता पाटील ( मनसे ) माघार
शिवसेना...
1 - पॅनल क्र. 24 अ
रमेश म्हात्रे ( शिंदेची शिवसेना उमेदवार ) बिनविरोध
प्रियांका आकाश पाटील ( ठाकरे गट) माघार
2 - पॅनल क्र. 28 अ
हर्षल राजेश मोरे ( शिंदेची शिवसेना उमेदवार ) बिनविरोध विजयी
पंढरीनाथ हिरु म्हात्रे ( अपक्ष ) माघार
शशिकांत बाळकृष्ण धोत्रे ( भाजप ) माघार
3 - पॅनल क्र. 24 क
वृषाली रणजीत जोशी ( शिंदेची शिवसेना उमेदवार ) बिनविरोध विजयी
डॉ मंजु विनय पाटील ( काँग्रेस ) माघार
नीलम हेमंत दाभोलकर ( मनसे ) माघार
4 - पॅनल क्र. 24 ड
विश्वनाथ राणे ( शिंदेची शिवसेना उमेदवार ) बिनविरोध विजयी
अश्विन ब्रम्हा पाटील ( मनसे ) माघार
अर्जुनप्रसाद रामजियामन मौर्या ( अपक्ष ) माघार
5 - पॅनल क्र. 28 ब
ज्योती राजन मराठे ( शिवसेना) बिनविरोध विजयी
मोहिनी जयंत जाधव ( अपक्ष) माघार
हे ही वाचा : पुण्यात विधवा महिलेनं जीन्स घातली म्हणून दीरानं वहिनीचा मोडला हात, पुरोगामी महाराष्ट्रात लाज आणणारा प्रकार
6 - पॅनल क्र. 11 अ
रेश्मा किरण निचळ ( शिंदेची शिवसेना उमेदवार ) बिनविरोध विजयी
दर्शना नितीन निचळ ( अपक्ष) माघार
सुशीला माळी ( ठाकरे गट ) माघार
शालिनी ठमके ( NCP SP) माघार
ADVERTISEMENT











