Panvel Muncipal Corporation : पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपचा पहिला उमेदवार नितीन पाटील यांच्या रुपाने विजयी झाल्याचं चित्र आहे. त्यानंतर आणखी चार जणांनी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अशातच त्यांची नावे आता समोर आली आहेत. पनवेल प्रभाग क्र. 19 अ या जागेसाठी दर्शना भोईर आणि शेकापच्या आघाडीकडून दिव्या चांगदेव बहिरा यांनी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर दोघांचेही अर्ज बाद करण्यात आले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुण्यात विधवा महिलेनं जीन्स घातली म्हणून दीरानं वहिनीचा मोडला हात, पुरोगामी महाराष्ट्रात लाज आणणारा प्रकार
पनवेलमध्ये भाजपचे उमेदवार विजयी
अशातच शेकापच्या उमेदवार दिव्या बहिरा यांनी अर्ज मागे घेतला होता. अशातच भाजपच्या दर्शना भोईर या आता बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपकडून अजय तुकाराम बहिरा आणि शेकाप आघाडीकडून चांगदेव बहिरा आणि दिव्या बहिरा यांनी अर्ज दाखल केला होता. पण त्यांनी अचानकपणे अर्ज मागे घेतला. यामुळे अजय बहिरा यांचा एकमेव अर्ज दाखल राहिला आणि नंतर त्यांची जागा ही बिनविरोध निवडून आली.
पनवेलमध्ये बिनविरोध निवडून आलेल्यांची नावे समोर
ज्यात, नितीन पाटील
रुचिता लोंढे
अजय बहिरा
दर्शना भोईर
प्रियंका कांडपिळे अशी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे समोर आली आहेत.
हे ही वाचा : पुण्यात विधवा महिलेनं जीन्स घातली म्हणून दीरानं वहिनीचा मोडला हात, पुरोगामी महाराष्ट्रात लाज आणणारा प्रकार
ADVERTISEMENT











