Kalyan Dombivali Election : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदान होण्यापूर्वीच शिवसेना-भाजप युतीने मोठी आघाडी घेतली आहे. या दोन्ही पक्षांचे मिळून तब्बल 9 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे चित्र समोर आलं आहे. भाजप 5 आणि शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने युतीच्या रणनीतीचे यश आता स्पष्टपणे दिसू लागलं आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही रणनीती आखली असल्याचं बोललं जात आहे. दोघांनीही मिळून कल्याण-डोंबिवलीत आपला दबदबा कायम ठेवला. तसेच त्यांनी मिळून जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच अर्ज माघारी घेण्यासाठी काही तास शिल्लक असल्याने काही उमेदवार बिनविरोध विजयी होणार असल्याची दाट शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुण्यात पतीनं झोपेचं सोंग घेतल्याचा पत्नीचा आरोप, रागाच्या भरात पतीवर उकळता चहाच ओतला, अख्खा चेहरा भाजला
महायुतीच्या पहिल्या बिनविरोध उमेदवार विजयी कोण?
महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे आता समोर आली आहे. कल्याण पूर्वेतील भाजपच्या माजी नगरसेविका रेखा राजन चौधरी या पहिल्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवार आहेत. त्यानंतर भाजपच्या आसावरी नवरे, रंजना पेणकर, मंदा पाटील आणि ज्योती पाटील या महिला उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवल्याचं सांगण्यात येत आहेत.
शिवसेनेच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची नावे
तर दुसरीकडे शिवसेनेच्या चार बिनविरोध विजयी उमेदवारांची नावे देखील आता समोर आली आहेत. माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी आणि हर्षल मोरे हे चारही उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. अशातच विजेत्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी फोन करून उमेदवारांचे अभिनंद केलं आहे. या यशामुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
हे ही वाचा : बीड हादरलं! 'मी घटस्फोट देऊन तुझ्याशी...' पोलीस अधिकाऱ्याचे महिलेला लग्नाचे आमिष, नंतर लॉजवर नेत केला अत्याचार
भाजप 5 आणि शिवसेना 4 या बिनविरोध विजयी उमेदावारांमुळे आगामी काही दिवसांत काहीजण आणखी उमेदवार बिनविरोध निवडणूक जिंकलीत असे संकेत आहेत. या बिनविरोध विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. तसेच कार्यकर्त्यांनी विजयानंतर मिठाई देखील वाटल्याचं चित्र दिसून आलं. यामुळे आता महायुतीचा महापालिका निवडणुकीच्या निकालाबाबत आत्मविश्वास वाढलेला दिसून येत आहे.
ADVERTISEMENT











