कमळ निशाणीवर उमेदवाराला दिलं तिकीट, आता भाजपच म्हणतंय हा आमचा उमेदवार नाही, उल्हासनगरात काय घडलं?

Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये कमळाच्या चिन्हावर लढणाऱ्या अधिकृत उमेदवाराला भाजपनेच हा उमेदवार आमचा नसल्याचं सांगितलं आहे.

Ulhasnagar News

Ulhasnagar News

मिथिलेश गुप्ता

04 Jan 2026 (अपडेटेड: 04 Jan 2026, 04:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक 19 - ब मध्ये काय घडलं? 

point

आम्ही चुकून उमेदवारी दिली भाजप नेत्यांनी काय सांगितलं

Ulhasnagar News : राज्यातील उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारीवरून एक मोठी खळबळ माजल्याचं चित्र आता समोर आलं आहे. कमळाच्या चिन्हावर लढणाऱ्या अधिकृत उमेदवाराला भाजपनेच हा उमेदवार आमचा नसल्याचं सांगितलं आहे. प्रभाग क्रमांक 19 मधील ही घटना असल्याचं वृत्त आहे. यामुळे आता भाजपच्या अंतर्गत विसंवाद आणि गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : काँग्रेस की ठाकरे बंधू? मुंबईत मुस्लिम मतदार कोणाला मतदान करणार? असेंडिया कंपनीचा सर्व्हेतून सगळं समोर

उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक 19 - ब मध्ये काय घडलं? 

उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक 19 - ब मधून भाजपचे मंडल अध्यक्ष बंटी कुर्शीजा यांच्या पत्नी लक्ष्मी कुर्शीजा यांनी भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नंतर त्यांना भाजपचे अधिकृच चिन्ह कमळ ही निशाणी देण्यात आली होती. मात्र, या संपूर्ण प्रकरणाला वेगळच वळण प्राप्त झालं आहे. भाजपने आता लक्ष्मी कुर्शीजा या पक्षाच्या अधिकृत उमेदवार नसल्याचा दावा करण्यात आला होता. याच प्रभागातील अपक्ष उमेदवार कोमल लेहरानी यांना भाजपने अधिकृत पुरस्कृत उमेदवार घोषित केले आहे. यामुळे आता उल्हासनगराात भाजपातील सावळा गोंधळ आता चव्हाट्यावर आला आहे.

भाजप नेत्यांनी काय सांगितलं?

तर दुसरीकडे लक्ष्मी कुर्शीजा यांनी आपण भाजपचे अधिकृत उमेदवार असल्याचं सांगितलं. तसेच नंतर तो कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याचा दावा केला आहे. तसेच मतदारांनी आपल्यालातत मतदान करून विजयी करावे, असे आवाहन केलं. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वदारिया यांनी यावर प्रतिक्रिया दिली की, लक्ष्मी कुर्शीजा या भाजपच्या अधिकृत उमेदवार नाहीत. त्यांना चुकून भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे.

हे ही वाचा : मुंबईत मराठी माणूस ठाकरे बंधूंना साथ देणार की महायुतीला? असेंडिया कंपनीचा सर्वात मोठा सर्व्हे समोर

हिच बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा भाजपने त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितला होता. पण त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही. त्यांनी उमेदवारी मागे घेतली नसल्याने त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार नाहीत. या सर्वच गोंधळामुळे आता प्रभाग क्रमांक 19-ब मध्ये मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    follow whatsapp