Lok Sabha Election 2024: "असं होतं का?", उद्धव ठाकरेंना विश्वजित कदमांचा संतप्त सवाल
Vishwajeet Kadam: उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा झटपट घेतल्याच्या निर्णयावर विश्वजित कदम यांनी संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT

Vishwajeet Kadam On Uddhav Thackeray : काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेली सांगलीची जागा मिळवण्यात उद्धव ठाकरेंनी बाजी मारली. महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम होण्यापूर्वीच ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारीही घोषित करून टाकली. ठाकरेंनी झटपट घेतलेल्या या निर्णयावर विश्वजित कदम यांनी संताप व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार करण्यासंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांनी सांगली पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.
विश्वजित कदम यांच्या भाषणातील मुद्दे
"ज्यावेळी ही चर्चा झाली, त्यावेळी दोन्ही मित्रपक्षांचे उघडपणे असं ठरलं होतं की, ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरची जागा लढायला हो म्हणतील, ते जो पक्ष निवडतील, त्या पक्षाला ही जागा देण्यात यावी. मग वरिष्ठ पातळीवर असं ठरलं होतं, तर सांगली आणि कोल्हापूरचा संबंध येतो कुठे?", असा सवाल विश्वजित कदमांनी केला.
हे ही वाचा>> Lok Sabha 2024 : शिवसेना-राष्ट्रवादीनेच केला काँग्रेसचा 'कार्यक्रम' ?
"हातकणंगलेची जागा शिवसेनेची होती. ती त्यांनी घ्यावी, आम्ही म्हणालो, महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळू. शिवसेनेच्या नेत्यासोबत तुम्ही आमच्यासाठी लढतात. प्रत्येक मुद्दा घेऊन तुम्ही तिथे लढत होतात. राजू शेट्टींचं आणि त्यांचं काय बिनसलं आम्हालाही कळलं नाही", असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.