पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, शिंदेसेनेत केला होता प्रवेश, पाहा कुठून लढणार?

मुंबई तक

Jalna Muncipal Corporation : ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याला जालना महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत पांगारकर हे प्रभाग क्रमांक 13 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

ADVERTISEMENT

The accused in the gauri lankesh murder case has been given a candidacy
The accused in the gauri lankesh murder case has been given a candidacy
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी निवडणूक लढवणार

point

'या' पक्षाचे तिकीट नाकारल्यानंतर हिंदू जनजागृती समितीत समील

Jalna Muncipal Corporation : ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याला जालना महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत पांगारकर हे प्रभाग क्रमांक 13 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. भाजपसह इतर काही पक्षांनी या उमेदवाराला अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले आहे, तर शिवसेनेनं त्याच्याविरोधात एकही उमेदवार उभा केला नाही.

हे ही वाचा : अशोक चव्हाण म्हणाले 'रोज खा मटण, दाबा कमळाचं बटण' यशोमती ठाकूरांनी चांगलंच झापलं म्हणाल्या, 'वडिलांची प्रतिमा...'

आधी शिंदेंच्या शिवसेनेत झाले होते सामील 

नोव्हेंबर 2024 मधील विधानसभा निवडणुकीत श्रीकांत पांगरकर शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाले. त्यांच्या प्रवेशावर लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्याच्या पक्षप्रवेशास स्थगिती दिली होती. पांगारकर यांनी 2001 ते 2006 दरम्यान जालना महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून काम पाहिले.

पक्षाचे तिकीट नाकारल्यानंतर हिंदू जनजागृती समितीत समील

2011 मध्ये पक्षाचे तिकीट नाकारल्यानंतर ते उजव्या विचारसरणीच्या हिंदू जनजागृती समितीत समील झाले होते. ऑगस्ट 2018 मध्ये, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) राज्यातील विविध ठिकाणांहून स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केल्याप्रकरणी पांगारकर यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध स्फोटके कायदा, स्फोटके पदार्थ कायदा आणि प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

हे ही वाचा : प्रशिक्षकाने मुलीला हॉटेलच्या खोलीत बोलावले, तिच्या खांद्यांना स्पर्श करून बेडवर झोपवत.. लाज आणणारा प्रकार

गौरी लंकेश हत्या प्रकरणात 17 जणांना अटक

गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2024 मध्ये श्रीकांत पांगारकर यांना जामीन मंजूर केला. 5 सप्टेंबर 2017 रोजी गौरी लंकेश यांची बेंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनं देशभरात एकच खळबळ उडाली होती. कर्नाटक पोलिसांनी आतापर्यंत एकूण 18 जणांनी ओळख पटवली असून 17 जणांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणात पांगारकरांनी मी निर्दोष असल्याचं सांगितलं. हत्या प्रकरण अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहे आणि ते निर्दोष असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp