अखेर 30 वर्षानंतर योग आला! शुक्र आणि शनीची दुर्मिळ युती, 'या' चार राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार
Venus and Saturn conjunction 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत येतात, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. सध्या मीन राशीमध्ये शुक्र आणि शनीची युती झाली आहे. हा योग 2 मार्च 2026 पासून सुरू झाला असून 26 मार्चपर्यंत प्रभावशाली राहणार आहे. सुमारे 30 वर्षांनंतर निर्माण झालेली ग्रहांची ही विशेष स्थिती अनेकांसाठी खास मानली जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अखेर 30 वर्षानंतर योग आला!
शुक्र आणि शनीची दुर्मिळ युती होणार
'या' चार राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार
Venus and Saturn conjunction : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत येतात, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. सध्या मीन राशीमध्ये शुक्र आणि शनीची युती झाली आहे. हा योग 2 मार्च 2026 पासून सुरू झाला असून 26 मार्चपर्यंत प्रभावशाली राहणार आहे. सुमारे 30 वर्षांनंतर निर्माण झालेली ग्रहांची ही विशेष स्थिती अनेकांसाठी खास मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, या काळात पैसा, करिअर आणि व्यवसायाशी संबंधित प्रकरणांमध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात. काही राशींसाठी हा काळ आर्थिक प्रगती, रखडलेली कामे पूर्ण होणे आणि नात्यात मजबूती आणणारा मानला जात आहे.
हे ही वाचा : Personal Finance: EMI बाऊन्स केल्यावर 'ही' चूक अजिबात नका करू, नाहीतर तुमचं...
'या' राशींच्या आयुष्यात होणार सकारात्मक बदल
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक बाबतीत दिलासा देणारा ठरू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग येऊ शकतात. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्गही खुले होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना लाभ मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि वैवाहिक जीवनातही गोडवा टिकून राहू शकतो. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित एखादे प्रकरण तुमच्या बाजूने निकाल देऊ शकते. तसेच या काळात आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यातील योजनांवर काम करण्याची चांगली संधी मिळेल.
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये बदलाचे संकेत मिळू शकतात. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. नवीन नोकरी किंवा उत्तम संधी मिळण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. जुन्या मित्रांच्या भेटी फायदेशीर ठरू शकतात. परदेशाशी संबंधित कामातही यश मिळण्याचे संकेत आहेत.










