प्रशिक्षकाने मुलीला हॉटेलच्या खोलीत बोलावले, तिच्या खांद्यांना स्पर्श करून बेडवर झोपवत.. लाज आणणारा प्रकार

मुंबई तक

Crime news : नेमबाजीचे प्रशिक्षण देणाऱ्या एका प्रशिक्षकाने एका अल्पवयीन मुलीसोबत वाईट कृत्य केल्याचा मुलीचा आरोप आहे. मुलीला एका खोलीत बोलावून तिला चुकीचा स्पर्श केला आणि नंतर जबरदस्तीने एका बेडवर झोपवल्याचा आरोप मुलीनं केला आहे. मुलीने या सर्वांचा विरोध केल्यानंतर प्रशिक्षकाने तिचं करिअर बरबाद करेन अशी धमकीच दिली होती.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रशिक्षकाने पीडितेला एका हॉटेलमध्ये बोलावलं अन्...

point

प्रशिक्षकाकडून करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

Crime news : नेमबाजीचे प्रशिक्षण देणाऱ्या एका प्रशिक्षकाने एका अल्पवयीन मुलीसोबत वाईट कृत्य केल्याचा मुलीचा आरोप आहे. मुलीला एका खोलीत बोलावून तिला चुकीचा स्पर्श केला आणि नंतर जबरदस्तीने एका बेडवर झोपवल्याचा आरोप मुलीनं केला आहे. मुलीने या सर्वांचा विरोध केल्यानंतर प्रशिक्षकाने तिचं करिअर बरबाद करेन अशी धमकीच दिली होती. यामुळे तिनं अनेक दिवस या प्रकरणाबाबत मौन बाळगलं होतं. या घटनेची माहिती पीडजितेच्या आईला समजली. नंतर 6 जानेवारी रोजी फरीदाबाद येथील एनआयटी महिला पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल करण्यात आला. या प्रकरणातील प्रशिक्षकाचं नाव अंकुश भारद्वाज असे आहे. 

हे ही वाचा : अशोक चव्हाण म्हणाले 'रोज खा मटण, दाबा कमळाचं बटण' यशोमती ठाकूरांनी चांगलंच झापलं म्हणाल्या, 'वडिलांची प्रतिमा...'

पीडित शूटरने तिच्या तक्रारीत म्हटलं की, 2016 पासून ती करणी सिंग शूटिंग रेंजमध्ये शूटिंगचा सराव करत होती. तिने आपलं शूटिंगचं कौशल्य वाढवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक अंकुश भारद्वाजकडे प्रशिक्षण सुरु केले. तेव्हापासून, प्रशिक्षकाने तिला देहारादून, पटियाला, मोहाली आणि दिल्लीला बोलावले. तक्रारीनुसार, पीडितेनं 16 डिसेंबर रोजी तिचा राष्ट्रीय स्तरावरील सामना होता, जो सकाळी 10 वाजता सुरु झाला आणि 11.45 वाजता संपला होता.

प्रशिक्षकाने पीडितेला एका हॉटेलमध्ये बोलावलं अन्...

त्यानंतर प्रशिक्षकाने सामन्याबाबत बोलण्याच्या बहाण्याने पीडितेला सूरजकुंड परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीमध्ये बोलावले आणि संपूर्ण सामन्यादरम्यान काय घडले ते कागदावर लिहून ठेवण्यास सांगितले. तक्रारीनुसार, पीडितेने सांगितले की, प्रशिक्षकाने पुन्हा लिफ्ट परिसरात येण्यास सांगितलं होतं. प्रशिक्षक लिफ्ट क्षेत्रात आल्यावर त्यांनी पीडितेला त्याच्या खोलीत जाऊन तेथे खेळाबाबत काही गोष्टी लिहून ठेवण्यास सांगितल्या होत्या.

प्रशिक्षकाकडून करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

नंतर पीडित मुलगी खोलीतील खुर्चीवर बसली होती, तिथेच सर्व सामन्याची नोंद देखील करण्यात आली होती. तेव्हा प्रशिक्षक तिचे खांदे दाबू लागला होता, पीडितेनं विरोध करताच, तो म्हणाला की, 'मी तुझी पाठ फोडून काढेन' जेव्हा पीडितेनं प्रतिकार करण्यास सुरुवात केली असता, तिला बेडवर जबरदस्ती झोपवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तेव्हा तिने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. नंतर तिचे करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देखील दिली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp