शिंदेंच्या उमेदवाराचा मातोश्रीसमोर प्रचार, कलानगरमधील लोकांना थेट माईकवरून आवाहन Video

मुंबई तक

Mumbai Muncipal Election : राज्यात सर्वच नेत्यांच्या मुलाखती सुरु असून प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसत आहे. अशातच आता शिंदेसेना वांद्रे मतदारसंघातील उमेदवार सुमित वजाळे यांनी प्रचारासाठी थेट मातोश्रीवर धाव घेतली आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Muncipal Election
Mumbai Muncipal Election
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिंदेसेनेचे वांद्रे मतदारसंघातील उमेदवार मातोश्रीवर धडकला

point

व्हिडिओ तुफान व्हायरल 

Mumbai Muncipal Election : राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या राज्यात सर्वच नेत्यांच्या मुलाखती सुरु असून प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसत आहे. अशातच आता शिंदेसेनेच्या वांद्रे मतदारसंघातील उमेदवार सुमित वजाळे यांनी प्रचारासाठी थेट मातोश्रीवर धाव घेतली आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

हे ही वाचा : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, शिंदेसेनेत केला होता प्रवेश, पाहा कुठून लढणार?

शिंदेसेनेचे वांद्रे मतदारसंघातील उमेदवार मातोश्रीवर धडकला, व्हिडिओ तुफान व्हायरल 

वांद्रे येथील प्रभाग क्रमांक 93 मधून सुमित वजाळे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. सध्या त्यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची एकच चर्चा होताना दिसत आहे. मी कलानगर या प्रभागातील उमेदवार असून सर्व सुज्ञ मतदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाणासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा', असं आवाहन देखील केलं आहे. शिंदेसेनेचे उमेदवार मातोश्रीबाहेर गेल्याचं चित्र आहे. या प्रचाराचं एक वेगळेपण असल्याचं बोललं जातंय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp