महाचावडी: '20 वर्षांचं भांडण सोडून जर मी एकत्र येऊ शकतो तर...', चावडीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले!
Raj Thackeray Mumbai Tak Mahachavadi: केवळ मराठी या गोष्टीसाठी आपण उद्धव ठाकरेंसोबतची भांडणं विसरून एकत्र आलो. असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना UBT आणि मनसेच्या युतीबाबतची भूमिका स्पष्ट केली.
ADVERTISEMENT

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई Tak च्या महाचावडीवर अत्यंत रोखठोक आणि परखड शब्दात मराठी भाषा आणि त्याच्या राजकारणाबाबत त्यांची मतं व्यक्त केली. आपण केवळ आणि केवळ मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र आलो असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना UBT सोबतच्या युतीमागची त्यांची भूमिका स्पष्ट केली.
एकनाथ शिंदेंप्रमाणे तुम्हाला सत्ताधाऱ्यांसोबत जुळवून घेता आलं असतं, पण तुम्ही तसं न करता वेगळी भूमिका घेतली. असा सवाल राज ठाकरेंना जेव्हा विचारण्यात आला तेव्हा यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आपण केवळ मराठी भाषेसाठी एकत्र उद्धव ठाकरेंसोबतचं भांडणं विसरून एकत्र आलो.
'20 वर्षाचं भांडण सोडून जर मी एकत्र येऊ शकतो फक्त मराठी या गोष्टीसाठी...'
'या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली फडणवीसांनी.. हिंदी सक्तीचा विषय त्यांनी कशासाठी आणला? मुळात फडणवीस, शिंदे अथवा कोणी यांच्या मुळात हातातच काही नाही. जे सांगितलं जाईल त्यावर सही करायची. तुम्ही जुळवून काय घेणार आहात? शिंदेंचं तिकडे जाणं हा वेगळा सत्तेचा भाग झाला. राजकीय मतभेद, आणि असलेले संबंध हे एका बाजूला.. पण मराठी, हिंदी सक्ती या गोष्टींवर तडजोड होणार नाही..'
हे ही वाचा>> महाचावडी: युतीनंतर 'ठाकरे' पहिल्यांदाच 'चावडी'वर, मुंबई Tak वर राज ठाकरेंची Super Exclusive मुलाखत!
'सलमान खान माझा मित्र आहे ना.. पण ज्या वेळेला एकूण महाराष्ट्राबद्दल किंवा इतर गोष्टींवर तुम्ही जेव्हा कमेंट करता तेव्हा मी मैत्री नाही पाहणार. मला आता खूप वर्ष झाली राजकारणात. ज्या संस्कारातून तुम्ही घडत असता.. त्या सगळ्या गोष्टी तुमच्यात राहतात. हा माझा आडमुठेपणा किंवा राजकीय मूर्खपणा नाहीए. सरेंडर व्हायला किती वेळ लागतो.. बघतोच आहोत आपण आजूबाजूला...'










