शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपने केला टप्प्यात कार्यक्रम.. अंबरनाथमध्ये काय-काय घडलं? क्रोनोलॉजी घ्या समजून.. तुम्हीही जाल चक्रावून!

रोहित गोळे

BJP-Congress Allaince: अंबरनाथ नगरपरिषेदत भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला अत्यंत पद्धतशीरपणे गाफील ठेवून सत्ता मिळवली आहे. ते नेमकं कसं घडलं आणि शिवसेनेला भाजपने कसं आस्मान दाखवलं याची क्रोनोलॉजीच आपण समजून घेऊया.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अंबरनाथ: अंबरनाथ नगर परिषदेत घडलेल्या राजकीय घडामोडींनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. देशभरात काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देणाऱ्या भाजपाने अंबरनाथमध्ये थेट काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्तेचा मार्ग निवडला आणि राज्यातच नव्हे तर देशात भाजपच्या या नव्या पॅटर्नची चर्चा झाली. पण खरं म्हणजे या सगळ्यात भाजपने पद्धतशीर पणे शिंदेच्या शिवसेनेचा टप्प्यात कार्यक्रम केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. हे नेमकं कसं घडलं, याची क्रोनोलॉजी काय हे आपण सविस्तर समजून घेऊया.  

भाजप–काँग्रेसची अत्यंत अनपेक्षित युती अंबरनाथ नगर परिषदेत झाली आणि शिंदेंची शिवसेना अंबरनाथमध्ये थेट सत्तेच्या स्पर्धेतून बाहेर फेकली गेली. त्यामुळे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले असतानाही आता त्यांना सरळ विरोधी बाकांवर बसावं लागणार आहे. 

शिंदेंच्या शिवसेनेसोबत काय, कसं आणि का घडलं?

अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक ही शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती. गेली अनेक वर्ष अंबरनाथ नगरपरिषद ही शिवसेनेच्या हाती होती. त्यामुळे येथे काहीही करून भाजपची सत्ता आणायची असा चंग स्थानिक भाजप नेत्यांनी बांधला होता. त्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभाही घेतली होती. 

नगरपरिषदेच्या सत्तेची हा सगळा सारीपाट भाजपने अतिशय व्यवस्थितपणे मांडला. नगर परिषद निवडणुकीत कोणी बाजी मारली हे साधारण तेथील नगराध्यक्ष कोणत्या पक्षाचा निवडून येतो यावर पाहिलं गेलं. कारण यंदा नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडून दिला गेला. त्यामुळे अंबरनाथमध्ये भाजपने सगळी ताकद ही आपला नगराध्यक्ष कसा निवडून येईल यासाठी लावली आणि योग्य रणनितीच्या जोरावर अंबरनाथ नगर परिषदेत भाजपच्या तेजश्री करंजुले या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. आणि इथेच खऱ्या अर्थानं सुरू झालं शिंदेंच्या शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठीच ऑपरेशन लोट्स!

हे वाचलं का?

    follow whatsapp