नाशिकमध्ये तपोवनावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल, फडणवीसांचं नाव न घेता म्हणाले, 'लाकुडतोड्या तरी..'
Raj Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 23 वर्षानंतर नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सभेनिमित्त एकत्र आले. या सभेत राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकेची तोफ डागली. त्याच सभेत बोलताना राज ठाकरे यांनी तपोवनाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना 'लाकुडतोड्या तरी बरा होता', असं म्हणत मिश्कील टोला लगावला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज ठाकरेंची तोफ धडाडली
तपोवनावरून राज ठाकरेंच्या फडणवीसांना कोपरखळ्या, 'लाकूडतोड्या तरी बरा होता'
Raj Thackeray : राज्यात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु असून प्रचाराचा धडाका चांगलाच सुरु आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 23 वर्षानंतर नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर घेण्यात आलेल्या संयुक्त सभेत राजकीयदृष्ट्या एकत्र दिसले. याच सभेत राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी बोलताना भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. त्यांनी बोलताना पक्षफुटीवर भाष्य केलं. ते म्हणाले की, 'इतक्या चुकीच्या पद्धतीने कॅरम फुटलाय की, कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहे कळत नाही', असं म्हणत त्यांनी हल्लाबोल चढवला. त्यानंतर त्यांनी तपोवनावरून देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता 'लाकुडतोड्या तरी बरा होता', असा मिश्कील टोला लगावला.
हे ही वाचा : अशोक चव्हाण म्हणाले 'रोज खा मटण, दाबा कमळाचं बटण' यशोमती ठाकूरांनी चांगलंच झापलं म्हणाल्या, 'वडिलांची प्रतिमा...'
राज ठाकरेंची तोफ धडाडली
'काही लोक हे वेडे झाले आहेत, उमेदवारी अर्ज भरताना छाननी होत असते, त्यावेळी एकाने एबी फॉर्म गिळून टाकला. निवडणुका नेमक्या थराला गेल्या आहेत. या महाराष्ट्रात 70-70 उमेदवार बिनविरोध निवडून येतात. नागरिकांना मतदानाचा अधिकारही मिळत नाही. अनेकदा तर दहशतीतून हे सुरु आहे. कल्याण डोंबिवलीत एका घरातील तीन उमेदवारांना 15 कोटींची ऑफर देण्यात आली होती. हे पैसे येतात कुठून?' असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला आहे.
'निवडणुकीत भीती घालायची, माणसं विकत घ्यायची, दहशत पसरवायची. तुमच्याकडे माणसं होती ना? 1952 साली जनसंघ नावाने आलेला पक्ष त्यांना 2026 मध्ये पोरं भाड्याने घ्यावी लागत आहेत. तुमच्या पक्षात लोक होते ना, मग तुम्हाला बाहेरून का लोक मागवायची आहेत? त्यांना पैसे मोजून बोलवायचं, एवढे दिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा अपमान नाही का?', असा तिखट सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. त्यानंतर बोलताना त्यांनी तपोवनाचा मुद्दा उपस्थित केला.
तपोवनावरून राज ठाकरेंच्या फडणवीसांना कोपरखळ्या, 'लाकूडतोड्या तरी बरा होता'
ते म्हणाले की, 'त्यांनी पक्षातील लोक छाटले आणि आता बाहेरून लोक मागवून पक्षात घेतात', असं राज ठाकरे म्हणाले. नंतर तपोवनाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरलं. ते म्हणाले की, 'लाकूडतोड्या तरी बरा होता. तो सोन्या चांदीच्या कुऱ्हाडीला भापला नाही', असं म्हणत त्यांनी टीकेची तोफ डागली.










