Sangli Lok Sabha 2024 : शिवसेना-राष्ट्रवादीनेच केला काँग्रेसचा 'कार्यक्रम' ?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले, उद्धव ठाकरे, शरद पवार.
नाना पटोले, उद्धव ठाकरे, शरद पवार.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर

point

कुणामुळे काँग्रेसने गमावली सांगलीची जागा?

Maharashtra Lok Sabha Maha Vikas Aghadi : सांगलीच्या जागेमुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेत किती टोकाचा संघर्ष झाला, हे काँग्रेसच्याच नेत्यांनी सांगितलं.  महत्त्वाचं म्हणजे सांगलीच्या जागेमुळे स्थानिक राजकारणातील समविचार नेत्यांमधील सुप्त संघर्षही यानिमित्ताने समोर आला. पण, काँग्रेसच्या मेळाव्यातून एक गोष्ट स्पष्टपणे समोर आली आणि चर्चाही सुरू झाली की, जागावाटप करताना सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसचाच कार्यक्रम झालाय. काय झालंय समजून घेऊयात... (Sangli Lok Sabha election Explainer)

ठाकरेंचा एकतर्फी निर्णय, काँग्रेसची नाराजी?

सांगलीच्या जागेसाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी ताकद लावली. पण, ठाकरेंनी ज्या जागेवरून सगळं घोडं अडलं होतं, तिथूनच उमेदवार जाहीर केला. या मतदारसंघात काँग्रेसचं ताकद चांगली आहे आणि तिथून विशाल पाटील तगडी लढत देतील, असे म्हटले जात असताना काँग्रेसला ठाकरेंनी धक्का दिला आणि तिथेच काँग्रेसचा कार्यक्रम झाला. 

काँग्रेसचा गेम झाला हे दुसरं तिसरं कुणी नाही, तर काँग्रेसचेच नेते म्हणाले. सांगलीच्या जागेबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काय म्हणाले ते बघा...

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

"मागील लोकसभा निवडणुकीत सांगलीतून काँग्रेसचे चिन्ह गायब केले. यंदाच्या निवडणुकीतही असेच षडयंत्र रचण्यात आले. या षडयंत्रात मी फसलो. ज्या लोकांनी सांगलीच्या जागेला दृष्ट लावली. त्यांच्या राजकारणालाही लवकरच दृष्ट लावू."

हेही वाचा >> नाशिकच्या जागेसाठी शिंदेंनी बनवला होता 'हा' प्लॅन; भुजबळांना दिली होती ऑफर

नाना पटोले यांचा रोख कुणाच्या दिशेने होता, याची चर्चाही आता सुरू होती. पण, महाविकास आघाडीतच काँग्रेसला सांगलीची जागा मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू होते. विश्वजित कदमांचं सांगलीतील भाषणातील विधानं लक्षात घेतलं तर ही गोष्ट अधिक स्पष्ट होते. 
 
विश्वजित कदम असं म्हणाले की, "या जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल, तर किमान आम्हाला विचारायचं तरी की, काय करायचं? एकतर जागा देणंच चुकीचं होतं, हे आमचं ठाम मत आहे. झालं काय, तुम्ही (काँग्रेस नेते पटोले, थोरात, चव्हाण) दिली नाही, मला माहितीये. आमचा आरोप रोष तुमच्यावर नाहीये. तुम्ही केलं ते केलं, पण कोण काय करत होतं यावर का बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल आहे."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "शिंदेंनी सांगावं की, मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होते?"

कदमांचं हे विधान सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये म्हणून महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनच प्रयत्न झाले, हीच बाब अधोरेखित करते.

ADVERTISEMENT

सांगलीत काँग्रेसला कुणाची लागली नजर?

नाना पटोलेंच्या भाषणातही काँग्रेसच्या पंजाला दृष्ट लागल्याचा उल्लेख आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्यावेळीप्रमाणेही यावेळीही षडयंत्र रचण्यात आले आणि आम्ही त्यात फसलो असे सांगितले. म्हणजे सांगलीची जागा काँग्रेसकडे जाऊ नये, अशी इच्छा सांगलीतील कोणत्या नेत्याची होती? असा प्रश्न उपस्थित झाला. कारण विश्वजित कदमांचाही रागही याच नेत्यावर असल्याचे दिसून आले.

 

"कधी म्हणतात की, मनासारखं होत नसेल, तर दृष्ट लागते. मला, आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली. विश्वजित कदम आणि काही नेते एकत्र आले त्याला दृष्ट लागली. परंतु मला आज एक सांगायचं आहे की, या जिल्ह्यामध्ये ज्यांनी दृष्ट लावली, ती दृष्ट काढता सुद्धा येते. ती दृष्ट काढण्याची जबाबदारी यापुढे विश्वजित कदम एकटा घेईन", असं विश्वजित कदम म्हणाले. पण यातून मविआतील मित्रपक्षातील नेत्यांकडूनच सांगलीत काँग्रेसचा 'कार्यक्रम' केला गेला हेही समोर आलं. याबद्दल आता सांगलीत उघडपणे चर्चाही सुरू आहे. पण, सांगलीत वर्चस्वाच्या राजकारणासाठी राजाराम बापू पाटील आणि वसंतदादा पाटील यांच्यापासून सुरू असलेलं राजकीय भांडण आता आणखी चिघळलंय, हे स्पष्ट झालं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT