लातूर : पॉलिटेक्निक कॉलेजच्या वसतीगृहासमोर रक्ताचा सडा, विद्यार्थ्याची हत्या; चौघांवर धारदार शस्त्रांनी वार
Latur Crime News : कॉलेजच्या मुख्य गेटसमोर दोन्ही गटांमध्ये भांडण उफाळले. या दरम्यान श्रीधर पाटील आणि त्याच्या एका साथीदाराने विक्रम पांचाळ तसेच त्याच्या इतर तीन मित्रांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात विक्रम पांचाळ गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लातूर : पॉलिटेक्निक कॉलेजच्या वसतीगृहासमोर रक्ताचा सडा
विद्यार्थ्याची हत्या; चौघांवर धारदार शस्त्रांनी वार
Latur Crime News : पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण लातूर शहरात खळबळ उडालीये. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना कॉलेजच्या वसतीगृहासमोर घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
अधिकची माहिती अशी की, लातूर शहरातील नंदिस्टॉप परिसरात असलेल्या पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हा वाद झाला. मयत विद्यार्थ्याचे नाव विक्रम पांचाळ असे असून तो संबंधित महाविद्यालयात थर्ड इयरमध्ये शिकत होता. त्याच महाविद्यालयात श्रीधर पाटील नावाचा युवक दुसऱ्या शाखेत शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विक्रम पांचाळ आणि श्रीधर पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला हा वाद शाब्दिक पातळीवर होता; मात्र काही वेळातच तो वाढत गेला. वादानंतर दोघांनीही आपापल्या मित्रांना तसेच घरातील लोकांना घटनास्थळी बोलावून घेतले.
यानंतर कॉलेजच्या मुख्य गेटसमोर दोन्ही गटांमध्ये भांडण उफाळले. या दरम्यान श्रीधर पाटील आणि त्याच्या एका साथीदाराने विक्रम पांचाळ तसेच त्याच्या इतर तीन मित्रांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात विक्रम पांचाळ गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेत आदित्य साडे (वय 20), सुजल रेडी (वय 20) आणि शंतनू परांडे (वय 17) हे तीन विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.










