ऑर्केस्ट्रा मालकाने बळजबरीने दारू पाजली अन् जंगलात नेऊन अल्पवयीन नृत्यांगनेवर दोघांकडून बलात्कार...

मुंबई तक

पीडितेच्या आरोपानुसार, ऑर्केस्ट्रा संचालकाने नृत्यांगनेला चिकन खाऊ घालण्याच्या बहाण्याने बळजबरीने भरपूर दारू पाजली आणि त्यानंतर, दोन कर्मचाऱ्यांनी तिला झुडुपात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

ADVERTISEMENT

अल्पवयीन नृत्यांगनेवर दोघांकडून बलात्कार...
अल्पवयीन नृत्यांगनेवर दोघांकडून बलात्कार...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑर्केस्ट्रा मालकाने बळजबरीने दारू पाजली अन्...

point

जंगलात नेऊन अल्पवयीन नृत्यांगनेवर दोघांकडून बलात्कार...

Crime News: उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या एका तरुणीवर बिहारमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. ऑर्केस्ट्रा पार्टी संचालकाच्या सांगण्यावरून त्याच्या कर्मचाऱ्याने उत्तर प्रदेशची रहिवासी असलेल्या अल्पवयीन नृत्यांगनेसोबत घृणास्पद कृत्य केलं. तसेच, दुसऱ्या कर्मचाऱ्याने देखील तिच्यासोबत दृष्कृत्य केलं. पीडितेच्या जवळच्या व्यक्तीच्या आरोपानुसार, ऑर्केस्ट्रा संचालकाने नृत्यांगनेला चिकन खाऊ घालण्याच्या बहाण्याने बळजबरीने भरपूर दारू पाजली आणि त्यानंतर, दोन कर्मचाऱ्यांनी तिला झुडुपात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल   

रविवारी हे प्रकरण समोर आल्यानंतर, पोलिसांनी यासंबंधी त्वरीत कारवाई करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. ऑर्केस्ट्रा पार्टी संचालक लक्ष्मण यादव तसेच अशोक यादव आणि ब्रम्हदेव डेरा अशी आरोपींची ओळख समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अशोक यादव ऑर्केस्ट्राचा डीजे ऑपरेटर असून जीतेंद्र कुमार यादव हा पीकअप ड्रायव्हर आहे. तिघांची चौकशी झाल्यानंतर, त्यांची तातडीने तुरुंगात रवानगी करण्यात आली असून तिघांविरुद्ध अल्पवयीन नृत्यांगनेवर बलात्कार केल्याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे ही वाचा: नागपूर : घरच्यांनी पोलीस भरतीच्या तयारीसाठी प्रशिक्षण केंद्रात पाठवलं, पण 11 वीची मुलगी प्रियकरासोबत बिहारला पळाली

पोलिसांनी दिली माहिती... 

या प्रकरणासंबंधी पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, शनिवारी (14 फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास ऑर्केस्ट्रा पार्टीमध्ये कार्यरत असलेल्या एका अल्पवयीन नृत्यांगनेवर बलात्कार करण्यात आला आहे. रविवारी सकाळी या प्रकरणाची माहिती मिळताच तिन्ही आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. आता, यासंबंधी पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून तिची मेडिकल तपासणी सुद्धा करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास जारी असून आरोपींविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हे ही वाचा: Astrology: आज वर्षातील पहिलं सूर्यग्रहण; 'या' राशीच्या लोकांचं नशीब पालटणार! प्रचंड पैसा अन्...

पीडितेने पोलिसात केली तक्रार 

पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री तिला ऑर्केस्ट्रा संचालकाने चिकन खाऊ घालण्याच्या बहाण्याने गच्चीवर नेलं आणि तिथे तिला बळजबरीने दारू पाजली. त्यानंतर, त्याने त्याच्या इतर दोन कर्मचाऱ्यांना तिथे बोलवलं आणि त्यावेळी अल्पवयीन पीडितेवर दोघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. परिसरातील एका जंगलात नेऊन नृत्यांगनेवर बलात्कार करण्यात आला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp