कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत कोण आहे सर्वात श्रीमंत उमेदवार? यादीच आली समोर

KDMC : केडीएमसी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलेल्यांपैकी कोणता उमेदवार अधिक श्रीमंत आहे, याची यादी आता समोर आली आहे.

KDMC municipal elections

KDMC municipal elections

मिथिलेश गुप्ता

06 Jan 2026 (अपडेटेड: 06 Jan 2026, 06:49 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोण आहे केडीएमसीमधील सर्वात श्रीमंत उमेदवार !

point

श्रीमंत उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे...

Kalyan-Dombivali Muncipal Corporration : कल्याण-डोंबिवली महापालिका ही एक महत्त्वाची महापालिका आहे. याच महापालिकेची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. या निवडणुकीत कोट्याधीश उमेदवारांची मांदियाळी बघायला मिळत आहे. 15 जानेवारी होणाऱ्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांची स्थावर-जंगम मालमत्ता आता समोर आली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : समोसेवाल्या काकांनी 10 वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार, क्रूरतेची सीमा गाठत... न्यायालयाने दिली 20 वर्षांची शिक्षा

या महापालिकेत उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या कोट्यवधी रुपयांची संपत्ती आता समरो आली आहे. राजकीय वारसा लाभलेला तरुण हा उमेदावारही या श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीच नाहीतर हाय प्रोफाइल ठरत असल्याचं चित्र आहे, एकूण श्रीमंत उमेदवारांची माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.

कोण आहे केडीएमसीमधील सर्वात श्रीमंत उमेदवार !

या निवडणुकीत भाजपचे वरुण पाटील यांनी सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून बाजी मारली आहे. माजी नगरसेवक असलेल्या वरुण पाटील यांच्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या एकूण मालमत्तेचा आकडा तब्बल 39 कोटी 72 लाख 76 हजार 411 रुपये इतका आहे. उद्योग, शेती आणि स्थावर मालमत्तेमुळे ते श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. श्रीमंत उमेदवारांच्या यादीत भाजपचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते.

इतर श्रीमंत उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे...

माजी नगरसेवक मंगेश गायकर यांचे सुपुत्र श्यामल गायकर यांच्याकडे 26 कोटी 74 लाखांहून अधिक संपत्ती आहे.

बिनविरोध निवडून आलेले भाजपचे महेश पाटील यांच्याकडेही पत्नीसमवेत 26 कोटी 36 लाख रुपयांची मालमत्ता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचे पुत्र आणि बांधकाम व्यावसायिक विक्रांत शिंदे यांच्याकडे 17 कोटी 85 लाख रुपयांची संपत्ती आहे.

भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पत्नी हेमा पवार यांनीही 15 कोटी 29 लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

शिवसेना (शिंदे गट) कडील उमेदवारांमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या ज्योती मराठे यांच्याकडे 13 कोटी 51 लाख,

तर सचिन पोटे आणि मल्लेश शेट्टी हेही कोट्याधीशांच्या यादीत आहेत.

कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांचे चिरंजीव हर्षल मोरे हे बिनविरोध निवडून आले असून त्यांनी 52 लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

वरुण पाटील - भाजप - 39 कोटी 72 लाख 76 हजार 411 रुपये

श्यामल गायकर - भाजप - 26 कोटी 74 लाख 69 हजार 944 रुपये

महेश पाटील - भाजप - 26 कोटी 36 लाख 47 हजार 609 रुपये (बिनविरोध विजयी)

विक्रांत शिंदे - राष्ट्रवादी काँग्रेस - 17 कोटी 85 लाख 42 हजार 779 रुपये

हेमा पवार - भाजप - 15 कोटी 29 लाख 29 हजार 290 रुपये

ज्योती मराठे - शिवसेना (शिंदे गट) - 13 कोटी 51 लाख 44 हजार 468 रुपये (बिनविरोध विजयी)

सचिन पोटे - शिवसेना (शिंदे गट) - 12 कोटी 49 लाख 4 हजार 214 रुपये

राहुल दामले - भाजप - 12 कोटी 14 लाख 68 हजार 604 रुपये

हे ही वाचा : अमरावती एमआयडीसीत थिनर कारखान्यात मोठा स्फोट, महिला कामगाराचा आगीत होरपळून मृत्यू

मल्लेश शेट्टी - शिवसेना (शिंदे गट) - 10 कोटी 36 लाख 42 हजार 941 रुपये

निलेश शिंदे - शिवसेना (शिंदे गट) - 8 कोटी 59 लाख 76 हजार 733 रुपये

जयेश म्हात्रे - भाजप - 7 कोटी 3 लाख 32 हजार 722 रुपये (बिनविरोध विजयी)

दीपेश म्हात्रे - भाजप - 6 कोटी 33 लाख 88 हजार 766 रुपये (बिनविरोध विजयी)

विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे - शिवसेना (शिंदे गट) - 4 कोटी 47 लाख रुपये

सूरज मराठे - शिवसेना (शिंदे गट) - 1 कोटी 83 लाख 89 हजार 341 रुपये

हर्षल मोरे - शिवसेना (शिंदे गट) - 52 लाख 14 हजार 322 रुपये (बिनविरोध विजयी)

    follow whatsapp