मुंबईची खबर: प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न! आता, रेल्वे स्थानकांवर नवीन सुविधा...

मध्य रेल्वेने प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबई मंडळाच्या अनेक स्थानकांवर सुविधांमध्ये वाढ केल्याचं पाहायला मिळतंय. प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणे, हाच मध्य रेल्वेचा उद्देश आहे.

रेल्वे स्थानकांवर नवीन सुविधा...

रेल्वे स्थानकांवर नवीन सुविधा...

मुंबई तक

• 04:11 PM • 27 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न!

point

मुंबईतील स्थानकांवर नवीन सुविधा...

Mumbai News: प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुखकर होण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेकडून बरेच प्रयत्न केले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबई मंडळाच्या अनेक स्थानकांवर सुविधांमध्ये वाढ केल्याचं पाहायला मिळतंय. प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणे, हाच मध्य रेल्वेचा उद्देश आहे. वृत्तानुसार, मुंबई विभागात एकूण 4 नवीन एस्केलेटर बसवण्यात आले असून यात कसारा स्थानकावर दोन आणि बदलापूर स्थानकावर दोन एस्केलेटर समाविष्ट आहेत. 

हे वाचलं का?

नवीन लिफ्टच्या सुविधा... 

तसेच, वांगणी स्थानकावर एक आणि बदलापूर स्थानकावर एक अशा दोन नवीन लिफ्टच्या सुविधा देखील सुरू करण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, अपंग व्यक्ती आणि जड सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म बदलणं लक्षणीयरीत्या सुलभ झालं आहे. 

हे ही वाचा: किरकोळ कारणावरून मित्रांमध्ये वाद! रागाच्या भरात तरुणाने थेट दगड डोक्यात घातला अन् नाल्यात फेकून...

स्थानकावर नवे पंखे लावण्यात आले

प्रवाशांच्या सोयीसाठी, विविध स्थानकांवर 142 नवीन बीएलडीसी पंखे बसवण्यात आले आहेत, तसेच 289 जुने पंखे नवीन बीएलडीसी पंख्यांनी बदलण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे. हे पंखे पारंपारिक पंख्यांच्या तुलनेत कमी वीज वापरतात आणि 50 ते 70 टक्के ऊर्जा वाचवतात. याव्यतिरिक्त, दादर स्थानकावरील विविध प्लॅटफॉर्मवर 8 नवीन हाय व्हॉल्यूम लो स्पीड (एचव्हीएलएस) पंखे बसवण्यात आले आहेत. या पंख्यांमुळे मोठ्या क्षेत्रात उत्तम व्हेंटिलेशन आणि थंडावा मिळतो. 

हे ही वाचा: Govt Job: सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! IBPS कडून मोठी भरती; 17 लाखांचं पॅकेज अन्...

नवीन एलईडी (LED) लाइट्स

ऊर्जेची बचत आणि चांगल्या प्रकाशयोजनेचा भाग म्हणून, मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर 362 नवीन एलईडी (LED) लाइट्स बसवण्यात आले आहेत . याव्यतिरिक्त, 1635 जुने एलईडी लाइट्स नवीन, अधिक कार्यक्षम लाइट्सनी बदलण्यात आले आहेत. यामुळे प्रकाशयोजना तर सुधारलीच पण त्यासोबत मेन्टेनन्सचा देखील खर्च कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

    follow whatsapp