मनात आलं म्हणून महिलेला चाकूने भोसकले, बायकोसोबतच्या वादानंतर 'तो' का बनला सायको किलर?

Crime News : मनात आलं म्हणून मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका 70 वर्षीय वृद्ध महिलेला त्याने चाकूने भोसकले. या सायको किलरचा त्याच्या बायकोसोबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. यामुळे तो मानलिकदृष्ट्या विचलित झाला होता. सर्वच महिलांविषयी त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला होता.

crime news

crime news

मुंबई तक

• 02:35 PM • 27 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मनात आलं म्हणून महिलेला चाकूने भोसकले

point

बायकोसोबतच्या वादानंतर 'तो' का बनला सायको किलर?

Crime News : आपण आजपर्यंत अनेक सायको किलर्सविषयी ऐकलेलं आहे. अशा सायको लोकांवर आधारित असलेले अनेक चित्रपटही निघत असतात. अशाच सायको किलरला पोलिसांनी नुकतंच ताब्यात घेतले आहे. मनात आलं म्हणून मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका 70 वर्षीय वृद्ध महिलेला त्याने चाकूने भोसकले. या सायको किलरचा त्याच्या बायकोसोबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. यामुळे तो मानलिकदृष्ट्या विचलित झाला होता. सर्वच महिलांविषयी त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला होता. यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचे उघड झाले आहे. या सायको किलरने नेमकी कुणाची हत्या केली आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या कशा आवळल्या जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : बुलढाणा : मित्राच्या मदतीने भावाला संपवलं, पुरावा नष्ट करण्यासाठी शेतात जाळला मृतदेह

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भोसकले

श्याम सुंदर नावाचा हा सायको किलर आहे उत्तर प्रदेशातील आग्र्याचा. आग्र्याची ओळख म्हणजे प्रेमासाठी उभारण्यात आलेला ताजमहाल. त्याच शहरात हा सायको किलर फिरत होता. येथील पुष्पांजली बाग येथील रहिवासी सोना देवी २२ फेब्रुवारी रोजी पहाटे ५:३० च्या सुमारास फिरण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. यावेळी आरोपी श्याम सुंदर याने मागून येत त्यांच्या पोटात चाकू भोसकला. चाकू पोटात आरपार घुसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. यानंतर या सायको किलरने तेथून पळ काढला. मात्र सकाळी फिरायला आलेल्या इतर नागरिकांनी महिलेला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने नंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले.

महिलांविषयी द्वेष का?

न्यू आग्रा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी श्याम सुंदर याला खासपूर परिसरातून अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत या हल्ल्यामागील कारण ऐकून पोलीसही अवाक झाले. आरोपीचे त्याच्या पत्नीशी गेल्या काही काळापासून सतत भांडण सुरू होते. या घरगुती वादामुळे तो मानसिकदृष्ट्या विचलित झाला होता आणि त्याच्या मनात सर्व महिलांविषयी प्रचंड द्वेष निर्माण झाला होता. याच रागातून त्याने समोर दिसलेल्या वृद्ध महिलेवर हल्ला केला. दरम्यान, या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

हे ही वाचा : 'मला मूव्ह ऑन करता येत नाही; तो मला शोधेल?' ब्रेकअपनंतर सुप्रसिद्ध युट्यूबरची आत्महत्या! आईला शेवटचा मॅसेज...

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांमध्ये दहशत

आरोपीवर खुनाचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अधिक तपास करत असून, त्याने यापूर्वीही अशा प्रकारचे कृत्य केले आहे का, याची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे दयालबाग परिसरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
 

    follow whatsapp