'मला मूव्ह ऑन करता येत नाही; तो मला शोधेल?' ब्रेकअपनंतर सुप्रसिद्ध युट्यूबरची आत्महत्या! आईला शेवटचा मॅसेज...

मुंबई तक

• 10:53 AM • 27 Feb 2026

युट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केलेली 21 वर्षीय युट्यूबरने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीडितेच्या घरातून एक सुसाईड नोट मिळाली असून प्रेमप्रकरणात ब्रेकअपच्या धक्क्यामुळे तिने हे आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं स्पष्ट होत आहे.

ब्रेकअपनंतर सुप्रसिद्ध युट्यूबरची आत्महत्या!

ब्रेकअपनंतर सुप्रसिद्ध युट्यूबरची आत्महत्या!

Google CTA

बातम्या हायलाइट

point

ब्रेकअपनंतर सुप्रसिद्ध युट्यूबरची आत्महत्या!

point

'मला मूव्ह ऑन करता येत नाही; तो मला शोधेल?' सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?

Youtuber Suicide: युट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केलेली 21 वर्षीय युट्यूबर बोनू कोमाली हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हैदराबादच्या मणिकोंडा परिसरातील आपल्या फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह आढळल्याची माहिती आहे. पोलिसांना पीडितेच्या घरातून एक सुसाईड नोट मिळाली असून प्रेमप्रकरणात ब्रेकअपच्या धक्क्यामुळे तिने हे आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

हे वाचलं का?

मूळची विशाखापट्टणम येथील रहिवासी असलेली बोनू कोमाली ही हैदराबादमध्ये ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत होती आणि ती यूट्यूबवर नेहमी सक्रिय होती. पोलिसांना मिळालेल्या तिच्या डायरीतून असं दिसून आलं की ती गेल्या 37 दिवसांपासून मानसिक तणावात होती. तसेच, ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर खूप प्रेम करत होती, मात्र आता त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे, पण ती त्याला अजूनही विसरू शकत नसल्याचं तिच्या चिठ्ठीवरून स्पष्ट होत आहे. 

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं? 

सुसाईड नोटमध्ये पुढे तिने लिहिलं की, "मला माझ्या आयुष्यात पुढे जायला (मूव्ह ऑन व्हायला) भीती वाटते, कारण काय माहित तो परत येईल? मला माहित आहे की मी त्याला सोडून द्यायला हवं. तो माझा नाही आणि माझ्यासोबत तो राहण्याचा प्रयत्नही करत नसल्याचं मला माहित आहे. पण माझ्या मनातील एक छोटासा कोपरा अजूनही त्याची वाट पाहतोय, अजूनही आशा करतो, अजूनही कल्पना करतो की एक दिवस तो मलाच निवडेल. आणि म्हणूनच पुढे जाणं मला अशक्य वाटतंय, कारण काय माहित की, ज्या क्षणी मी खरोखर निघून जाईन, तो मागे वळून मला शोधेल?" 

हे ही वाचा: 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? कधीपासून झाली सुरूवात? जाणूया इतिहास आणि महत्त्व

आईला केला शेवटचा मॅसेज... 

मृत तरुणीची आई कामानिमित्त कुवेतमध्ये असते. घटनेच्या दिवशी सकाळी तिने तिच्या आईला एक भावनिक मॅसेज पाठवला. या शेवटच्या मॅसेजमध्ये तिने लिहिलं की, "आई, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू स्वतःची आणि माझ्या धाकट्या भावाची काळजी घे." हे वाचून तिची आई अस्वस्थ झाली आणि तिच्या मनात वेगळाच संशय निर्माण झाला. त्यानंतर, आईने कुवेतहून बोनूला खूपदा फोन केले, पण तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तिने हैदराबादहून तिच्या एका मैत्रिणीला बोनूच्या घरी जायला सांगितलं. तिथे पोहोच्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यावेळी, तातडीने पोलिसांना फोन करून प्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घराचा दरवाजा तोडल्यानंतर आत बोनूचा मृतदेह आढळला. त्यानंतर, पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. 

पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, बोनू कोमाली मागील काही महिन्यांपासून मानसिक तणावात होती. आता, तिच्या मोबाईन फोनचा डेटा, कॉल रेकॉर्ड्स आणि सोशल मीडिया अकाउंटची तपासणी केली जात आहे. तसेच, तिच्या मित्रांची आणि नातेवाईकांची देखील चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोनू कोमालीने नुकतंच तिच्या एक्स-बॉयफ्रेंडला तिच्या फ्लॅटवर भेटण्यासाठई बोलवलं असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं.