सावकाराने इतकं टॉर्चर केलं की घरावर अक्षरश: वरवंटा फिरला, एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्यायलं, तिघांचा मृत्यू

Crime News : पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यांना तीन पानांची एक सुसाईड नोट सापडली आहे. या चिठ्ठीतून या आत्महत्येमागचे भीषण वास्तव समोर आले आहे. कुटुंबाने आपल्या मृत्यूसाठी वैभव रुंगटा नामक सावकाराला जबाबदार धरले आहे.

 Crime News

Crime News

मुंबई तक

• 08:00 AM • 27 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

सावकाराने इतकं टॉर्चर केलं की घरावर अक्षरश: वरवंटा फिरला

point

एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्यायलं, तिघांचा मृत्यू

Crime News : गुजरातच्या सूरत शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचना आणि सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दुर्दैवी घटनेत पती, पत्नी आणि एका मुलीचा मृत्यू झाला असून, दुसरी मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

सूरतच्या वेसू भागातील 'हॅप्पी एलिगन्स' अपार्टमेंटमध्ये बालमुकुंद हे आपल्या कुटुंबासह राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच वेसू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे बालमुकुंद, त्यांची पत्नी प्रियांका आणि मुलगी पृथ्वी यांचा मृत्यू झाला होता. सुदैवाने, दुसरी मुलगी भव्या हिचा जीव वाचला असून तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

तीन पानांची सुसाईड नोट आणि सावकाराचा जाच

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यांना तीन पानांची एक सुसाईड नोट सापडली आहे. या चिठ्ठीतून या आत्महत्येमागचे भीषण वास्तव समोर आले आहे. कुटुंबाने आपल्या मृत्यूसाठी वैभव रुंगटा नामक सावकाराला जबाबदार धरले आहे.

हेही वाचा : मुंबईची खबर: मुंबईकरांनो! 3,550 घरांसाठी लॉटरी निघणार... म्हाडाची मोठी घोषणा! मोक्याच्या जागी 31 लाखांत हक्काचं घर

सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे की,वैभव रुंगटा या कुटुंबाचा मानसिक छळ करत होता. तो जबरदस्तीने पैशांची वसुली (खंडणी) करत होता. त्याने पीडित कुटुंबाची मोपेड (दुचाकी) जबरदस्तीने जप्त केली होती. इतकेच नाही तर, त्याने बालमुकुंद यांचे क्रेडिट कार्डही स्वतःकडे ठेवले होते आणि त्यावरून तो स्वतःसाठी खरेदी करत होता.

पोलिस कारवाई आणि गुन्हा दाखल

या प्रकरणी वेसू पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. आरोपी वैभव रुंगटा याच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा (Abetment of Suicide) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालमुकुंद यांनी सावकाराच्या सततच्या छळाला आणि वसुलीच्या त्रासाला कंटाळून पत्नी आणि दोन मुलींसह विष पिऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

 "आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून सुसाईड नोटच्या आधारे तपास सुरू केला आहे. वाचलेल्या मुलीची प्रकृती स्थिर झाल्यावर तिचा जबाब नोंदवला जाईल. आरोपी सावकारावर कठोर कारवाई केली जाईल," असे वेसू पोलिस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

परिसरात हळहळ

एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा अंत झाल्याने हॅप्पी एलिगन्स अपार्टमेंटमधील रहिवासी सुन्न झाले आहेत. आर्थिक अडचणीत अडकलेल्या व्यक्तींना सावकार कसे वेठीस धरतात, याचे हे एक विदारक उदाहरण समोर आले आहे. सध्या पोलिस आरोपी वैभव रुंगटाचा शोध घेत असून, त्याने अशाच प्रकारे इतर कोणाला त्रास दिला आहे का, याचाही तपास केला जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जालना : अंगावर सीमा अन् खुशी नावाचे दोन टॅटू, विहिरीत अज्ञात व्यक्तीचा सडलेला मृतदेह आढळला, पाहू देखील वाटेना!
 

    follow whatsapp