पतीला मुलगाच हवा होता... रागाच्या भरात दोन महिन्यांच्या गर्भवती पत्नीसह तीन मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या!

पतीनेच आपल्या गरोदर पत्नीसह तीन मुलींची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. वृत्तानुसार, बुधवारी (25 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास घरात जवळपास 30 वर्षीय महिला आणि तिच्या तीन अल्पवयीन (3, 4 आणि 5 वर्षे) मुलींचे मृतदेह आढळले.

गर्भवती पत्नीसह तीन मुलींची गळा चिरून हत्या!

गर्भवती पत्नीसह तीन मुलींची गळा चिरून हत्या!

मुंबई तक

• 10:50 AM • 26 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पतीला मुलगाच हवा होता...

point

दोन महिन्यांच्या गर्भवती पत्नीसह तीन मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या!

Crime News: पतीनेच आपल्या गरोदर पत्नीसह तीन मुलींची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित घटना दिल्लीच्या समयपूर बदली परिसरात घडली असून या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वृत्तानुसार, बुधवारी (25 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास चंदन पार्कमधील एका घरात जवळपास 30 वर्षीय महिला आणि तिच्या तीन अल्पवयीन (3, 4 आणि 5 वर्षे) मुलींचे मृतदेह आढळले. तिघींची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित महिला दोन महिन्यांची गर्भवती होती. 

हे वाचलं का?

पोलिसांचा तपास 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव अनीता असून तिचा पती मुंचुट केवट याला पोलिसांनी मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं असून सध्या, आरोपी पती फरार असल्याची माहिती आहे. सकाळी 8 च्या सुमारास शेजारी राहणाऱ्या लोकांनी आणि पीडितांच्या नातेवाईकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी माहिती दिली की, धारदार शस्त्राने पीडिता आणि तिच्या अल्पवयीन मुलींचा गळा चिरून त्यांचा खून केला. क्राइम आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचं निरीक्षण केलं आणि पुरावे गोळा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. या प्रकरणात, भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1) (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे ही वाचा: अजित पवारांच्या अपघाताची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, मुंबई हायकोर्टात जनहित याचिका; 'या' आहेत प्रमुख मागण्या

हत्येमागचं नेमकं काय कारण? 

संबंधित कुटुंब मूळ बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील रहिवासी असून ते गेल्या दोन वर्षांपासून समयपूरच्या चंदर पार्क परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. पीडितांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात वाद झाला होता. दरम्यान, प्राथमिक तपासात पोलिसांना असा संशय आहे की आरोपी पतीला मुलगा हवा होता आणि तीन मुलींनंतर पत्नीच्या गर्भात मुलगीच असण्याच्या भितीमुळे त्याने हे भयानक कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. आता पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत असून हत्येमागचं नेमकं कारण काय? याचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. 
 

    follow whatsapp