Crime News : पतीने पत्नीची हत्या केल्याप्रकरणी बिहारच्या अरवल न्यायालयाने मोठी कारवाई केली आहे. पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षांपूर्वी मेहेंदिया पोलीस ठाणे परिसरातील जमुहारी गावात बिरबल साहू याने त्याची पत्नी सुमंती सिंगवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं. पती एवढ्यावर थांबला नाहीतर त्याने पीडितेच्या गुप्तांगात बाटली घातली, नंतर तिचे 12 तुकडे करण्यात आले. या घटनेनं कुटुंबातील लोकांच्या पायाखालची जमीन सरकून गेली. या प्रकरणी अरवलचे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधिश प्रथम रंजन मिश्रा यांच्या न्यायालयाने दोषी नवऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 7 वीत शिकणाऱ्या मुलीला मोबाईलचं व्यसन, मोबाईल देण्यास बहिणीचा नकार, अखेर स्वत:ला संपवलं
हे प्रकरण 20 जुलै 2024 रोजीदरम्यान घडले होते. शिक्षा सुनावल्यानंतर मंगळवारी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अरवल न्यायालयात मृत्यूंदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे. संबंधित प्रकरणात वकील बिंदू भूषण प्रसाद यांनी सांगितले की, पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलेला बिरबल साहू हा त्याचा मुलगा राजकुमार सिंह याने मेहेंदिया पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल केला होता. आरोपी बिरबल हा वृद्ध व्यक्ती असून तो शिक्षक होता.
खोलीचा दरवाजा बंद करून पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला
घटनेदिवशी पती-पत्नीमध्ये वाद झाला होता, नंतर बिरबल साहूने त्याच्या खोलीचा दरवाजा बंद करून त्याच्या पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत ठार केले. त्याच सायंकाळी, जेव्हा बिरबलचा नातू शाळेतून घरी परतला असता, रक्ताचा सडा पाहून आरडाओरड केली. मोठी सून संजू देवी आली असता, तिचे सासरे बिरबल यांच्या हातात कुऱ्हाड दिसली होती.
हे ही वाचा : शिक्षकाने गोठ्यात नेऊन तिसरीच्या विद्यार्थिनीवर केले अत्याचार, गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर प्रकरणंही बाहेर
पत्नीचे बारा तुकडे केले
गोंधळ ऐकून गावकारी देखील हादरून गेले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिरबल साहूने घटनास्थळी आलेल्यांना धमकावण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तपास करत मृतदेह ताब्यात घेत बिरबर साहूला अटक केली. बिरबलने पत्नीचा मृतदेहाचे बारा तुकडे केले होते.
ADVERTISEMENT











