शिक्षकाने गोठ्यात नेऊन तिसरीच्या विद्यार्थिनीवर केले अत्याचार, गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर प्रकरणंही बाहेर

Crime News : एका नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींवर केलेल्या अत्याचाराची बातमी समोर येत आहे. नराधम शिक्षकाने तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तिसरीत शिकणाऱ्या मुलीला फूस लावून शिक्षकाने तिला एका गोठ्यात नेले आणि त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर हा प्रकार समोर आला. मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र नराधम शिक्षक अजूनही फरार आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

26 Feb 2026 (अपडेटेड: 26 Feb 2026, 02:54 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिक्षकाने गोठ्यात नेऊन तिसरीच्या मुलीला गोठ्यात नेऊन केले अत्याचार

point

गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर प्रकरणंही बाहेर

Crime News : विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस म्हणून घडवण्याचं काम शिक्षकाचं असतं. मात्र शिक्षकच जर हैवान आणि विकृत मानसिकतेचा असेल तर काय? अशाच एका नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींवर केलेल्या अत्याचाराची बातमी समोर येत आहे. नराधम शिक्षकाने तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तिसरीत शिकणाऱ्या मुलीला फूस लावून शिक्षकाने तिला एका गोठ्यात नेले आणि त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर हा प्रकार समोर आला. मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र नराधम शिक्षक अजूनही फरार आहे. ही संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील बिजनोर परिसरातील आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : जालना: आधी झाडाखाली, नंतर ढाब्यावर... 5 जणांकडून भोळसर महिलेवर सामूहिक अत्याचार! न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

गोठ्यात नेऊन अत्याचार

अंशुल कुमार असं या आरोपी शिक्षकाचं नाव आहे. हा गावाशेजारील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. २३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास पीडित मुलगी घराबाहेर खेळत होती. यावेळी अंशुलने तिला गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढले आणि जवळच असलेल्या एका गोठ्यात नेले. तिथे त्याने या चिमुरडीवर बळजबरीने अत्याचार केला. पीडितेची प्रकृती बिघडल्यानंतर आणि तिला त्रास होऊ लागल्यानंतर तिने कुटुंबीयांना घडला प्रकार सांगितला.

दुसऱ्या विद्यार्थिनीसोबत अत्याचार

पीडित मुलीच्या वडिलांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, ही तक्रार दाखल होत असतानाच आणखी एक महिला पोलीस ठाण्यात पोहोचली. तिनेही याच शिक्षकाने आपल्या मुलीसोबत अश्लील चाळे आणि घृणास्पद कृत्य केल्याचा गंभीर आरोप केला आहे. एकाच शिक्षकाकडून अनेक विद्यार्थिनींना लक्ष्य केले जात असल्याची शक्यता निर्माण झाल्याने पालकांमध्ये घबराट आणि संतापाचे वातावरण आहे.

हे ही वाचा : कल्याण: "आई-बाबा त्रास करून घेऊ नका..." बारावीच्या परीक्षेच्या भितीने 17 वर्षीय विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य!

आरोपी शिक्षक फरार

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी शिक्षक अंशुल कुमार घरातून फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बलात्काराच्या कलमान्वये आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून, त्याच्या अटकेसाठी विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. शाळेतीलच एका शिक्षकाने अशा प्रकारचे नीच कृत्य केल्यामुळे शिक्षण क्षेत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 

    follow whatsapp