Crime News : एका 22 वर्षीय चुलत्याने आपल्या 7 वर्षाच्या पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या नराधम चुलत्याने आपल्याच पुतण्यावर बलात्कार केला होता. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून त्याने बनियनने पुतण्याचे नाक-तोंड दाबून हत्या केली. बुधवारी (25 फेब्रुवारी) पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगर परिसरातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : कल्याण: "आई-बाबा त्रास करून घेऊ नका..." बारावीच्या परीक्षेच्या भितीने 17 वर्षीय विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य!
बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ
ही घटना 22 फेब्रुवारीच्या रात्री घडली. 7 वर्षीय मुलगा गावातील एका समारंभासाठी गेला होता. उशिरापर्यंत मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर 23 फेब्रुवारीच्या सकाळी एका मंदिराजवळ या मुलाचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली. सुरुवातीला ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत रस्ता रोको केला होता. पोस्ट मार्टम अहवालात मुलाचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे आणि त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Sex) झाल्याचे स्पष्ट झाले.
बायको माहेरी असल्याने विकृती
तपासादरम्यान पोलिसांना संशय आला की, घटनेच्या रात्रीपासून मृत मुलाचा चुलता पिंटू बेपत्ता आहे. पोलिसांनी त्याला शोधून काढून कडक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीची पत्नी बऱ्याच काळापासून माहेरी राहत होती, त्यातूनच त्याच्या मनात विकृत विचार आले. त्याने मुलाला पैशाचे आमिष दाखवून निर्जन स्थळी नेले आणि तिथे हे घृणास्पद कृत्य केले. आपले बिंग फुटेल या भीतीने त्याने मुलाचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह लपवून ठेवला.
हे ही वाचा : नागपूर : भाचा बेडरुममध्ये शिरला अन् मामीसोबत केले नको तेच, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई
आरोपी पिंटूवर आता खुनाच्या कलमांसोबतच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला कुटुंबीयांच्या संशयावरून गावातील इतर चार निष्पाप लोकांवर गुन्हा दाखल झाला होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे खरा गुन्हेगार समोर आला आणि निरपराध लोक तुरुंगात जाण्यापासून वाचले. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून नातेसंबंधांमधील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT











