लग्नाच्या दहा महिन्यांतच बायकोची मृत्यू, माहेरच्या मंडळींचा धक्कादायक आरोप; नवरा ताब्यात

Crime News : एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (24 फेब्रुवारी) एका 28 वर्षीय विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पीडितेच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी हत्या केल्याचा आणि त्यानंतर मृतदेह फासावर लटकवल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 05:12 PM • 25 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाच्या दहा महिन्यांतच बायकोची मृत्यू

point

माहेरच्या मंडळींचा धक्कादायक आरोप

point

नवरा ताब्यात

Crime News : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (24 फेब्रुवारी) एका 28 वर्षीय विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पीडितेच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी हत्या केल्याचा आणि त्यानंतर मृतदेह फासावर लटकवल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : लातूर : 30 वर्षीय मुलाने आपल्याच घरात आईचे दागिने चोरले! अवघ्या तीन तासांत पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्...

हुंड्यासाठी छळ

मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता हिचा विवाह 10 महिन्यांपूर्वी राजपाल याच्याशी झाला दिला होता. लग्नात आपल्या क्षमतेनुसार हुंडा देऊनही सासरचे लोक समाधानी नव्हते. लग्नानंतर काही दिवसांतच सुनीताचा छळ सुरू झाला. सोमवारी रात्री सासरच्यांनी तिच्याकडे माहेरून एक लाख रुपये आणि इतर वस्तू आणण्यासाठी तगादा लावला. तिने नकार देताच पती राजपाल, सासू गंगादेवी, सासरे मंगलसेन आणि नणंद प्रीती यांनी मिळून तिची हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.

मृत्यूची बातमी माहेरी सांगितलीच नाही

धक्कादायक म्हणजे, मुलीच्या मृत्यूची बातमी सासरच्यांनी माहेरच्यांना दिलीच नाही. एका नातेवाईकाकडून माहिती मिळाल्यानंतर जेव्हा वडील मुलीच्या सासरी पोहोचले, तेव्हा तिचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता आणि पतीसह इतर कुटुंबीय घरातून पसार झाले होते. योगायोगाने सुनीताच्या मोठ्या बहिणीचे लग्नही याच गावात झाले आहे, मात्र तिलाही या घटनेची माहिती सासरच्यांनी मिळू दिली नाही. या कृत्यामुळे परिसरात सासरच्या मंडळींविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा : रात्री बारा वाजता चिमुकलीला तेल, कुंकू लावलं अन् देवासमोर उभं करुन कुऱ्हाडीने मुंडकं छाटलं; सावत्र आईने का घेतला जीव?

हुंडाबळीचा गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि नायब तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी सांगितले की, 'वडिलांच्या तक्रारीवरून पतीसह चार जणांविरुद्ध हुंडाबळीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपींना लवकरच अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.'
 

    follow whatsapp