रात्री बारा वाजता चिमुकलीला तेल, कुंकू लावलं अन् देवासमोर उभं करुन कुऱ्हाडीने मुंडकं छाटलं; सावत्र आईने का घेतला जीव?
Crime News : एका सावत्र आईने आपल्या केवळ 3 वर्षांच्या निष्पाप मुलीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेत आरोपी महिलेने चिमुरडीचे मुंडके धडावेगळे केले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. रात्री बाराच्या सुमारास तेल आणि कुंकू लावून आरोपी महिलेने चिमुरडीला तयार केले. यानंतर तिला देवघरापुढे उभे करुन तिची हत्या केली. आदिती असं मृत चिमुरडीचं नाव आहे
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रात्री बारा वाजता चिमुरडीला तेल, कुंकू लावलं अन् देवासमोर उभं करुन कुऱ्हाडीने मुंडकं छाटलं
सावत्र आईनेच घेतला जीव
Crime News : एका सावत्र आईने आपल्या केवळ 3 वर्षांच्या निष्पाप मुलीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेत आरोपी महिलेने चिमुरडीचे मुंडके धडावेगळे केले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. रात्री बाराच्या सुमारास तेल आणि कुंकू लावून आरोपी महिलेने चिमुरडीला तयार केले. यानंतर तिला देवघरापुढे उभे करुन तिची हत्या केली. आदिती असं मृत चिमुरडीचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्र हादरला! भावाने सख्ख्या बहिणीचा तलवारीने गळा चिरला; जन्मदात्या आईला सुद्धा सोडलं नाही...
महिन्यापूर्वी झाले होते लग्न
मुलीचे वडील त्रिवेणी मौर्य यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना आदिती नावाची 3 वर्षांची मुलगी होती. मुलीचा सांभाळ व्हावा आणि घराला आधार मिळावा, या उद्देशाने त्रिवेणी यांनी 25 जानेवारी 2026 रोजी दुसरे लग्न केले होते. मात्र, लग्नाला महिना उलटत नाही तोच या सावत्र आईने पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करण्याऐवजी तिचे आयुष्य संपवले.
'अशी' केली हत्या
घटनेच्या रात्री नेमकं काय घडलं, याबाबत ग्रामस्थांनी धक्कादायक माहिती दिली आहे. रात्री 12 च्या सुमारास या महिलेने चिमुरड्या अदितीला तेल आणि कुंकू लावून तयार केले. त्यानंतर तिला घरातील देवघरापाशी नेऊन कुऱ्हाडीने तिचा गळा चिरला. ही घटना नरबळीचा प्रकार असावा, असा संशय काही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. घरात काहीतरी हालचाल होत असल्याचे लक्षात येताच बाहेर झोपलेल्या त्रिवेणी यांनी आत जाऊन पाहिले, तेव्हा हा भयानक प्रकार उघडकीस आला.










