दोन महिन्यांच्या तान्हुल्याचा रडण्याचा आवाज आला, आईने तोंडात बोळा कोंबून पेटत्या चुलीत फेकलं!

मुंबई तक

Crime News : महिलेने संतापाच्या भरात आपल्या केवळ दोन महिन्यांच्या निष्पाप चिमुरड्याची निर्घृण हत्या केली. मुलाच्या सततच्या रडण्याला कंटाळून या मातेने त्याला जळत्या चुलीत फेकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळलीये.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दोन महिन्यांच्या तान्हुल्याचा रडण्याचा आवाज आला

point

आईने तोंडात बोळा कोंबून पेटत्या चुलीत फेकलं!

Crime News, हैदराबाद :  तेलंगणमधील हैदराबाद शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथील बोवरामपेट परिसरात राहणाऱ्या एका महिलेने संतापाच्या भरात आपल्या केवळ दोन महिन्यांच्या निष्पाप चिमुरड्याची निर्घृण हत्या केली. मुलाच्या सततच्या रडण्याला कंटाळून या मातेने त्याला जळत्या चुलीत फेकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने पोलिसांच्या अंगावरही काटा आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ममता आणि तिचा पती राजेंद्र हे मूळचे मध्य प्रदेशचे रहिवासी असून ते हैदराबादमध्ये एका अपार्टमेंटमध्ये चौकीदार आणि मजूर म्हणून काम करतात. ही थरारक घटना तेव्हा उघडकीस आली, जेव्हा राजेंद्र सकाळी आपले काम आटोपून घरी परतला. त्याने घरात प्रवेश करताच पाहिले की, त्याची पत्नी ममता दोन महिन्यांच्या बाळाला पेटत्या चुलीत ढकलत होती. संतापलेल्या ममताने बाळाच्या किंकाळ्या कोणाला ऐकू जाऊ नयेत म्हणून त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता आणि डोळ्यांवर पट्टी बांधली होती. राजेंद्रने बाळाला वाचवण्यासाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे निष्पाप बाळाचा जागीच मृत्यू झाला होता.

हेही वाचा : 10 वीचा गणिताचा पेपर सुरु असताना प्रसुती वेदना, विद्यार्थीनीने बाथरुममध्ये दिला बाळाला जन्म, माहिती मिळताच कान्हा फरार

या प्रकरणाची माहिती मिळताच सायबराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बाळ बराच वेळ रडत असल्याने ममताचे मानसिक संतुलन बिघडले आणि तिने रागाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलले. पोलीस आता या प्रकरणाचा 'पोस्टपार्टम डिप्रेशन' (बाळंतपणानंतरचा मानसिक तणाव) या कोनातूनही तपास करत आहेत. बाळाची काळजी घेताना कोणाचीही मदत मिळत नसल्यामुळे ममतावर मानसिक दडपण होते का, याचा शोध पोलीस घेत आहेत. बाळाचा मृतदेह अत्यंत भाजलेल्या अवस्थेत ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp