आधी स्वत:चे बोट कापले, नंतर बायकोचे शीर धडावेगळे केले अन् वृद्ध वडिलांना...

एका नवऱ्याने आपल्या बायकोची आणि वडिलांची निघृण हत्या केलीये. यामागे तंत्र-मंत्राचा संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याने बायकोची केली हत्या

point

शीर धडावेगळं करुन त्रिशूळासमोर ठेवलं

point

नेमकं कारण काय?

Crime News : एका थरारक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली आहे. एकाच रात्री एकाच कुटुंबातील दोन जणांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. मंगल चौधरी असे आरोपीचे नाव असून, त्याने आधी आपली पत्नी रुम्पा चौधरी आणि नंतर वडील राजेंद्र चौधरी यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत आणि शोककळा पसरली आहे. पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील ही घटना आहे.

आधी पत्नीची हत्या, नंतर वडिलांनाही संपवलं

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी मंगल चौधरी याने आधी स्वतःचे बोट कापले आणि त्यानंतर घरातील मंदिरात त्याच्या 39 वर्षीय पत्नीची हत्या करून तिचे शिर त्रिशूळासमोर नेऊन ठेवले. यानंतर त्याने आपल्या 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वडिलांनाही संपवले. अत्यंत क्रूर पद्धतीने घडलेल्या या हत्याकांडानंतर आरोपी उघड्यावर हातात चाकू घेऊन गावात फिरत होता, ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हे ही वाचा : गोकुळच्या निवडणुकीत मुलाचा पराभव, आता मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया

घटनेमागे तंत्र-मंत्रांचा संबंध

या घटनेमागे अंधश्रद्धा किंवा तंत्र-मंत्राचा संबंध असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. मृत दाम्पत्य नियमित पूजा-पाठ करत असे आणि त्यांच्या घरी एक तांत्रिक येत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. मात्र, या हत्यांचा कथित तांत्रिक प्रथेशी प्रत्यक्ष संबंध आहे किंवा नाही, याबाबत पोलीस अद्याप तपास करत असून अधिकृत दुजोरा देण्याचे टाळले आहे.

हे ही वाचा : बायकोला सोडून 35 वर्षीय गर्लफ्रेंडसोबत राहू लागला, पण फ्लॅटमध्ये घडलं भयानक कांड

पोलिसांनी काय सांगितले?

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अथक प्रयत्नांनंतर आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत आणि या भीषण हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी कसून चौकशी सुरू केली आहे. तपासाअंतीच यामागील सत्य समोर येईल.