Crime News : मुलगी शिकली, प्रगती झाली असं एक विधान आपण सतत ऐकत असतो. मात्र त्यांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे. मुलींचं शिकणंच नव्हे तर त्यांची सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. शाळेत निघालेल्या एका 13 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केली आहे. आठवीची परीक्षाव देण्यासाठी ती घराबाहेर पडली होती. मात्र ती परीक्षा केंद्रावर पोहोचू शकली नाही. यानंतर शोधाशोध केली असता तिचा अर्धवट विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आरोपी श्याम सुंदर याला अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील ही हृदयद्रावक घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, 70 वर्षीय नराधमानंही गय केली नाही; मुलगी गरोदर राहिल्यानंतर सगळा प्रकार समोर
बलात्कार केल्याचा संशय
तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपी श्याम सुंदरला ताब्यात घेतले असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला रस्त्यात एकटे गाठून अडवले होते. जेव्हा तिने प्रतिकार केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने तिची गळा आवळून हत्या केली. मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडल्याने बलात्कार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच यावर अधिक स्पष्टता येईल असे पोलिसांनी सांगितले.
पोस्ट मार्टम करण्यास नकार
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. दोषींना अटक करेपर्यंत मृतदेहाचे पोस्ट मार्टम करण्यास कुटुंबीयांनी नकार दिला होता. या प्रकरणामुळे राजकीय वातावरणही तापले असून माजी मंत्री देवी सिंह भाटी, भंवर सिंह भाटी आणि इतर नेत्यांनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एडीजी लता मनोज यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली होती.
हे ही वाचा : घरात घुसून 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, घाबरुन मुलगी गप्प बसली; यानंतर घडलं भयकंर
प्रशासनाकडून नोकरीचे आश्वासन
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत आणि एका नातेवाईकाला कंत्राटी तत्त्वावर नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिले, त्यानंतर चार दिवसांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले. 'आम्ही मुख्य आरोपीला अटक केली असून त्याला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सर्व पुरावे गोळा केले जात आहेत,' असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भाजपा नेते देवी सिंह भाटी यांनी सांगितले की, प्रशासनाच्या आश्वासनानंतर विरोध मागे घेत पीडित कुटुंबाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करू.
ADVERTISEMENT











