तरुण भाचीसोबत बोलायचा, मामाने केलं कांड; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

15 Jun 2026 (अपडेटेड: 15 Jun 2026, 03:21 PM)

एक तरुण आपल्या भाचीसोबत बोलतोय याचा तिच्या दोन मामांना राग आला. यातून दोघांनी मिळून टोकाचा निर्णय घेतला. नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

तरुण भाचीसोबत बोलायचा

point

मामाने केलं कांड

point

नेमकं काय घडलं?

Junagadh crime newsएक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीशी बोलल्याचा राग मनात धरून तिच्या दोन मामांनी एका तरुणाच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली. सुरुवातीला हा एक सामान्य अपघात असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता, मात्र पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासल्यानंतर या संपूर्ण घटनेमागचे धक्कादायक सत्य आणि कट कारस्थान उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

कारचालक झाले फरार

ही घटना 10 जून रोजी घडली. दोन तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. जखमी तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत होते, पण पोलिसांच्या तपासाची सुई वेगळ्याच दिशेने फिरली.

हे ही वाचा : प्रेयसीला डोकं मांडीवर ठेवायला लावलं, कुरवाळलं अन्...हॉटेलच्या रुममध्ये मोठं कांड

कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी

मागणीनुसार पोलिसांनी जेव्हा घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा पोलिसांना मोठा संशय आला. फुटेजमध्ये कारचालक मुद्दाम आणि थेट दुचाकीच्या दिशेने कार वेगाने आणून धडक देत असल्याचे स्पष्ट दिसत होते. एवढेच नाही तर धडक दिल्यानंतर दुचाकीवरील तरुणांना काही अंतरापर्यंत कारने घसटत नेल्याचेही समोर आले. हा अपघात नसून तरुणांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून जीवे मारण्याचा प्रयत्न होता, हे सीसीटीव्ही फुटेजमुळे सिद्ध झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता यामागील कौटुंबिक वादाची आणि वैमनस्याची बाजू समोर आली.

हे ही वाचा : ‘चड्डी बनणार नाही..’, असं का म्हणत होतात? पत्रकारांच्या प्रश्नावर सायोनी घोष काय म्हणाल्या? VIDEO

भाचीसोबत फोनवर बोलायचा तरुण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी याकूब घमेरिया आणि अनवर घमेरिया अशी असून ते शेपा गावचे रहिवासी आहेत. पीडित तरुण हा या दोन्ही आरोपींच्या भाचीसोबत फोनवर किंवा प्रत्यक्ष बोलत होता. आरोपी मामांना त्यांच्या भाचीचे या तरुणाशी बोलणे अजिबात पसंत नव्हते. त्यांनी यापूर्वीही तरुणाला त्यांच्या भाचीपासून दूर राहण्याची आणि न बोलण्याची ताकीद दिली होती. मात्र, तरीही त्यांचे बोलणे सुरूच राहिल्याने मामांनी तरुणाचा काटा काढण्यासाठी अपघाताचा कट रचला. सध्या मांगरोल पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे.