स्पा सेंटरच्या बंद दाराआड वेश्याव्यवसायाचं रॅकेट, आरोपींवर कारवाई अन्..

मुंबई तक

15 Jun 2026 (अपडेटेड: 15 Jun 2026, 05:48 PM)

Crime news : एका स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलांना वाचवले. पोलिसांनुसार, अनैतिक पद्धतीने करण्यात आलेली तस्करी आणि देह व्यापाराची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली.

Crime news

Crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पोलीस ग्राहक बनून स्पा सेंटरमध्ये

point

पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये छापा टाकला

Crime news : दिल्ली पोलिसांनी पहाडगंज परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलांना वाचवले. पोलिसांनुसार, मध्य दिल्लीमध्ये अनैतिक पद्धतीने करण्यात आलेली तस्करी आणि देह व्यापाराची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. आरोपीची पुष्टी केल्यानंतर पोलिसांनी एक विशेष पथक गठीत करून तपास सुरू केला.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : 19 वर्षीय मुलीला बापानेच कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं, बायको वाचवायला गेली अन्..

पोलीस ग्राहक बनून स्पा सेंटरमध्ये

तपासादरम्यान पोलीस अधिकारी ग्राहक बनून स्पा सेंटरमध्ये पोहोचला. तिथे संबंधित पोलीस अधिकाऱ्यास पैसे देऊन वेश्याव्यवसायाची माहिती मिळाली. पोलिसांच्या माहितीनुसार, बनावट ग्राहक होऊन स्पा चालकाला पूर्वनियोजितपणे 1800 रुपये देण्यात आले. नंतर त्याची एका महिलेशी ओळख करून देण्यात आली होती. 

पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये छापा टाकला

माहितीच्या आधारे, पोलिसांच्या पथकाने स्पा सेंटरमध्ये छापा टाकला. तपासादरम्यान, वेश्याव्यवसायाचे पुरावे आढळून आले. नंतर पोलिसांनी स्पा चालवणाऱ्या 29 वर्षीय सैवेद उर्फ शब्बीरला अटक करण्यात आली. 

हे ही वाचा : स्नॅपचॅटवर फ्रेंड रिक्वेस्ट, 16 वर्षीय पीडितेला घरी नेलं अन् नको तेच..

संबंधित प्रकरणात तपासादरम्यान, पाच महिलांची सुटका करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांची ओळख उघड केलेली नाही. पुढील प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.  या प्रकरणाची पोलीस पुढील कारवाई करत आहेत.