घरात घुसून 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, घाबरुन मुलगी गप्प बसली; यानंतर घडलं भयकंर

मुंबई तक

Crime News : एका 30 वर्षीय व्यक्तीने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या नराधमाच्या कृत्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली आणि सोमवारी (23 फेब्रुवारी) तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आरोपीने तिच्यावर फक्त अत्याचरच केले नाहीत; तर पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओही बनवले. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

घरात घुसून 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार

point

घाबरुन मुलगी गप्प बसली

point

यानंतर घडलं भयकंर

Crime News : एका 30 वर्षीय व्यक्तीने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या नराधमाच्या कृत्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली आणि सोमवारी (23 फेब्रुवारी) तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आरोपीने तिच्यावर फक्त अत्याचरच केले नाहीत; तर पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओही बनवले. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद परिसरातील ही घटना आहे.

हे ही वाचा : सोलापूर: जावयानेच केला सासऱ्याचा खून! ऊसाच्या शेतात गाठून निर्घृण हत्या; नंतर स्वत:वर सुद्धा चाकूने वार...

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

हा प्रकार सुमारे एक वर्षापूर्वी सुरू झाला. पीडितेचे कुटुंबीय घराबाहेर गेले असताना आरोपी सरताज याने घरात घुसून मुलीवर जबरदस्ती केली. केवळ अत्याचारच नाही, तर नराधमाने या कृत्याचे अश्लील फोटो आणि व्हिडिओही बनवले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो गेल्या वर्षभरापासून पीडितेवर दबाव टाकत राहिला. यामुळे घाबरलेल्या मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.

गोंडस मुलीला दिला जन्म

काही दिवसांपूर्वी पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी दवाखान्यात नेले. तिथे अल्ट्रासाऊंड केल्यानंतर ती गरोदर असल्याचे समोर आले, ज्यामुळे पालकांना मोठा धक्का बसला. वारंवार विचारणा करूनही भीतीने तिने काहीच सांगितले नाही. सोमवारी तिला प्रसुती वेदना सुरू झाल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आणि वडिलांनी पोलीस ठाणे गाठले.

हे वाचलं का?

    follow whatsapp