3 वर्षीय मुलीवर परप्रांतीय मजुराचा अत्याचार, चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू

Crime News : तीन वर्षांच्या चिमुरडीवर 19 वर्षीय मजुराने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

15 Jun 2026 (अपडेटेड: 15 Jun 2026, 03:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

3 वर्षीय मुलीवर परप्रांतीय मजुराचा अत्याचार

point

चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू

Crime News : एका तीन वर्षांच्या मुलीचा परप्रांतीय मुजराने लैंगिक अत्याचार केल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी बिपिन मांझी या 19 वर्षीय परप्रांतीय मजुराला अटक केली आहे. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी पोलीस स्टेशनबाहेर तीव्र निदर्शने केली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही आंदोलकांनी या गुन्ह्यात एकापेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : 20 तासांपूर्वीची पोस्ट पाहून विश्वास बसणार नाही, छावा सिनेमात काम केलेल्या अभिनेत्रीची आत्महत्या

निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर केला अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे पालक सिपकॉट औद्योगिक वसाहतीतील एका स्टील कंपनीत काम करतात. आरोपी हा देखील त्याच कंपनीत मुलीच्या वडिलांसोबत कामाला होता आणि त्यांच्याच परिसरात राहत होता. रविवारी रात्री जेव्हा मुलगी पुदुपेट्टाई येथील रस्त्यावर इतर मुलांसोबत खेळत होती, तेव्हा आरोपीने तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवून जवळच्या एका निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिला झुडपात टाकून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : छावा सिनेमात काम केलेल्या अभिनेत्रीने आत्महत्या का केली? ‘ते’ प्राथमिक कारण चर्चेत

उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू 

एका महिलेला ती मुलगी सापडल्यानंतर तिने आरडाओरडा केला, ज्यामुळे स्थानिक नागरिक तिथे जमा झाले. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच नागरिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मुलीला सुरुवातीला कोट्टाकाई येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर तिला उपचारासाठी चेन्नईतील स्टॅन्ले सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. एका संशयिताला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाच्या सर्व पैलूंची पडताळणी करण्यासाठी आणि आणखी कोणी यात सामील आहे का, याचा तपास करण्यासाठी पोलीस पुढील चौकशी करत आहेत. स्थानिक नागरिकांनी दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. ही घटना तामिळनाडूमधील तिरुवल्लूर जिल्ह्यातील गुमीदिपुंडी येथे घडली.