19 वर्षीय मुलीला बापानेच कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं, बायको वाचवायला गेली अन्..

मुंबई तक

15 Jun 2026 (अपडेटेड: 15 Jun 2026, 04:41 PM)

crime news : एका व्यक्तीने आपल्याच 19 वर्षीय मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला करत तिची हत्या केली. मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या बायकोवर देखील आरोपीने हल्ला केला, त्या हल्ल्यात बायको गंभीर जखमी झाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला. 

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

हैवान बापाने 19 वर्षीय मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं

point

बायको वाचवण्यास आली अन्..

Crime news : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने आपल्याच 19 वर्षीय मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला करत तिची हत्या केली. मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या बायकोवर देखील आरोपीने हल्ला केला, त्या हल्ल्यात बायको गंभीर जखमी झाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : स्नॅपचॅटवर फ्रेंड रिक्वेस्ट, 16 वर्षीय पीडितेला घरी नेलं अन् नको तेच..

हा खळबळजनक प्रकार फिरोजाबाद जिल्ह्यातील सोफीपुर गावात रविवारी रात्री उशिरा घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, काही क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. बघता बघता वाद इतका विकोपाला गेला की, प्रकरणाला गंभीर रुप मिळालं. या घटनेनंतर संपूर्ण गावात दहशतीचं वातावरण पसरलं. 

हैवान बापाने 19 वर्षीय मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं

पोलीस अधीक्षक अनुज कुमार चौधरी यांनी सांगितलं की, सुरुवातीला हे प्रकरण समोर आले असून राकेश राठोड नावाच्या हैवानी बापाने आपल्या 19 वर्षीय मुलगी मुस्कावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात मुस्कान गंभीररित्या जखमी झाली होती. तिला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तिचा जागीच मृत्यू झाला. 

हे ही वाचा : 3 वर्षाच्या मुलीला बिस्कीटाचं आमिष दाखवलं, नंतर पळवून नेलं अन्..

जेव्हा मुस्कानची आई मुस्कान देवी ही आपल्या मुलीला वाचवण्यासाठी समोर आली तेव्हा आरोपी वडिलांनी मुलीवर हल्ला केला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राकेश राठोडला अटक केली.