हॉटेल मालकाची बायको अन् मुलासह आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा, पण भावाच्या जबावामुळे ट्वीस्ट

Crime News : अंबरपेट येथील त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी ही हृदयद्रावक घटना घडली. बराच वेळ झाला तरी घराचा दरवाजा उघडला गेला नाही आणि आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा शेजाऱ्यांना शंका आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा तोडला. आत रामराज (५५), त्यांची पत्नी माधवी (वय 50) आणि मुलगा शशांक (24) यांचे मृतदेह आढळून आले.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 09:11 AM • 26 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

हॉटेल मालकाची बायको अन् मुलासह आत्महत्या

point

सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा, पण भावाच्या जबावामुळे ट्वीस्ट

Crime News, हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील अंबरपेट परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील प्रसिद्ध 'लँडमार्क हॉटेल'चे मालक रामराज, त्यांची पत्नी आणि मुलाने राहत्या घरी सामूहिक आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाइड नोट आणि मृत्युपत्र जप्त केले आहे.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

अंबरपेट येथील त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी ही हृदयद्रावक घटना घडली. बराच वेळ झाला तरी घराचा दरवाजा उघडला गेला नाही आणि आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा शेजाऱ्यांना शंका आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा तोडला. आत रामराज (५५), त्यांची पत्नी माधवी (वय 50) आणि मुलगा शशांक (24) यांचे मृतदेह आढळून आले.

सुसाइड नोट आणि मृत्युपत्रातील धक्कादायक खुलासा

पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोट सापडली आहे, ज्यामध्ये रामराज यांनी आर्थिक टंचाईमुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी मृत्यूपूर्वी एक मृत्युपत्रही तयार केले होते. त्यात त्यांनी आपली सर्व जंगम आणि स्थावर मालमत्ता मुलगी अमूल्या हिच्या नावावर केली आहे. अमूल्या सध्या कोमपल्ली येथे राहते.

कुटुंबीयांनी फेटाळले आर्थिक टंचाईचे दावे

एकीकडे सुसाइड नोटमध्ये आर्थिक चणचणीचा उल्लेख असला, तरी रामराज यांच्या भावाने हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मते, कुटुंब पूर्णपणे सदन होते आणि त्यांच्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नव्हती. भावाच्या या विधानामुळे मृत्यूचे गूढ अधिक वाढले असून, आत्महत्येमागे नेमके काय कारण असावे, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पोलिस तपास सुरू

तुंगा नगर पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कुटुंब खरोखरच कर्जात बुडाले होते का? की या आत्महत्येमागे काही कौटुंबिक किंवा खासगी कारण आहे? या दिशेने पोलिस सध्या तपास करत आहेत. पोलिसांनी सध्या संशयास्पद मृत्यूची नोंद केली असून अधिक चौकशी सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जालना : अंगावर सीमा अन् खुशी नावाचे दोन टॅटू, विहिरीत अज्ञात व्यक्तीचा सडलेला मृतदेह आढळला, पाहू देखील वाटेना!
 

    follow whatsapp