महिला पोलीस अधिकारी कारमध्ये बाळाला दूध पाजत असताना नराधमांचे अश्लील हावभाव, बसमधून नको ते केलं

Crime News : ही घटना रविवारी घडली, जेव्हा महिला पोलीस अधिकारी आपल्या खाजगी कारने सिव्हिल ड्रेसमध्ये प्रवास करत होत्या. कार चालक गाडी चालवत होता आणि त्या आपल्या लहान बाळाला दूध पाजत होत्या. दरम्यान, एका ट्रॅफिक सिग्नलवर त्यांची कार थांबली असता, शेजारीच एक सिटी बस येऊन उभी राहिली

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:11 AM • 26 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिला पोलीस अधिकारी कारमध्ये बाळाला दूध पाजत असताना नराधमांचे अश्लील हावभाव

point

बसमधून नको ते केलं

Crime News : जोधपूरमध्ये महिला सुरक्षेच्या दाव्यांची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. एका महिला पोलीस अधिकाऱ्यालाच (RPS) टवाळखोरांच्या अश्लील चाळ्यांचा सामना करावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, या महिला अधिकाऱ्याने केवळ धाडसच दाखवले नाही, तर सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करून आरोपीला रंगेहाथ पकडून दिले.

हे वाचलं का?

ही घटना रविवारी घडली, जेव्हा महिला पोलीस अधिकारी आपल्या खाजगी कारने सिव्हिल ड्रेसमध्ये प्रवास करत होत्या. कार चालक गाडी चालवत होता आणि त्या आपल्या लहान बाळाला दूध पाजत होत्या. दरम्यान, एका ट्रॅफिक सिग्नलवर त्यांची कार थांबली असता, शेजारीच एक सिटी बस येऊन उभी राहिली. या बसमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने महिला अधिकाऱ्याच्या दिशेने पाहून अश्लील इशारे करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आपल्याला काहीतरी गैरसमज झाला असावा असे त्यांना वाटले, पण जेव्हा त्या व्यक्तीचे अश्लील चाळे सुरूच राहिले, तेव्हा त्यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले.

हेही वाचा : पप्पा सगळं तिचंच ऐकतात! बहिणीची शॉलने गळा आवळून केली हत्या, भावानं कसा रचला कट?

सिग्नल हिरवा होताच सिटी बस पुढे निघून गेली, पण महिला अधिकाऱ्याने हार मानली नाही. त्यांनी तात्काळ आपल्या चालकाला बसचा पाठलाग करण्याचे निर्देश दिले. काही अंतरावर त्यांनी बस थांबवली आणि स्वतः बसमध्ये चढून आरोपीला पकडले. या आरोपीची ओळख बशीर उर्फ गुलाब उर्फ रमजान (४०, रा. टोंक) अशी झाली आहे. महिला अधिकाऱ्याने जाब विचारत आरोपीला चांगलाच चोप दिला आणि तत्काळ कंट्रोल रूमला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला शांतता भंगाच्या आरोपाखाली अटक केली.

या प्रसंगानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याने समाजातील महिलांना एक परखड संदेश दिला आहे. कोणत्याही महिलेसोबत अशी वागणूक किंवा छेडछाड झाली तर घाबरून न जाता त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. अतिरिक्त पोलीस उपायुक्त प्रेम धणदे यांनीही सोशल मीडियावर या कारवाईची माहिती शेअर करत महिला अधिकाऱ्याच्या धैर्याचे कौतुक केले आहे. तसेच, अशा समाजकंटकांविरुद्ध महिलांनी न घाबरता पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अविवाहित असताना आई झाल्याने बापानेच केली मुलीची हत्या; प्रियकराने नवजात बाळाला पुलाखाली फेकले

    follow whatsapp