अविवाहित असताना आई झाल्याने बापानेच केली मुलीची हत्या; प्रियकराने नवजात बाळाला पुलाखाली फेकले

मुंबई तक

Crime News : ही घटना मधेपुरा जिल्ह्यातील उदाकिशुनगंज परिसरात घडली. 13 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास पीडित तरुणीला प्रसूती कळा येऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे तिने एका सुदृढ मुलीला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर रक्तस्त्राव अधिक झाल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. हीच संधी साधून मुलीच्या पित्याने आणि चुलत्याने तिला रुग्णवाहिकेऐवजी स्वतःच्या खाजगी गाडीतून नेण्याचे ठरवले. परंतु, तिला दवाखान्यात नेण्याऐवजी ते घरी घेऊन गेले आणि तिथेच लोक-लाजेस्तव तिचा गळा दाबून खून केला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अविवाहित असताना आई झाल्याने बापानेच केली मुलीची हत्या

point

प्रियकराने नवजात बाळाला पुलाखाली फेकले

Crime News : मधेपुरा (बिहार) : बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. 'इज्जती'च्या खोट्या कल्पनेतून एका पित्याने आणि चुलत्याने आपल्या 20 वर्षीय पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. धक्कादायक म्हणजे, ज्या प्रियकरामुळे ती तरुण मुलगी गरोदर राहिली, त्यानेही माणुसकी सोडून आपल्या अवघ्या काही तासांच्या नवजात बाळाला पिशवीत भरून पुलाखाली फेकून दिले. पोलिसांनी याप्रकरणी मुलीचा पिता, चुलता आणि प्रियकर अशा तिघांनाही अटक केली आहे.

हॉस्पिटलमधूनच रचला हत्येचा कट

ही घटना मधेपुरा जिल्ह्यातील उदाकिशुनगंज परिसरात घडली. 13 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास पीडित तरुणीला प्रसूती कळा येऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे तिने एका सुदृढ मुलीला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर रक्तस्त्राव अधिक झाल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. हीच संधी साधून मुलीच्या पित्याने आणि चुलत्याने तिला रुग्णवाहिकेऐवजी स्वतःच्या खाजगी गाडीतून नेण्याचे ठरवले. परंतु, तिला दवाखान्यात नेण्याऐवजी ते घरी घेऊन गेले आणि तिथेच लोक-लाजेस्तव तिचा गळा दाबून खून केला.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आणि पोलिसांची दिशाभूल

हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी पिता आणि चुलता तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी भागलपूर येथील गंगा घाटावर घेऊन जात होते. मात्र, संशयास्पद हालचालींमुळे स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि नवगछियाजवळ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. स्वतःला वाचवण्यासाठी पित्याने पोलिसांकडे असा बनाव केला की, आपली मुलगी गरोदर असल्याचे आपल्याला माहितच नव्हते आणि तिच्या प्रियकरानेच तिचे लैंगिक शोषण करून तिला धोका दिला.

हे वाचलं का?

    follow whatsapp