13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, 70 वर्षीय नराधमानंही गय केली नाही; मुलगी गरोदर राहिल्यानंतर सगळा प्रकार समोर

Crime News : एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चौघांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, या कृत्याचा व्हिडिओ बनवून तिला तब्बल सहा महिने ब्लॅकमेल केले. या सततच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली असून, या प्रकरणातील आरोपींमध्ये एका 70 वर्षीय वृद्धाचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 03:44 PM • 25 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

point

70 वर्षीय नराधमानंही गय केली नाही

point

मुलगी गरोदर राहिल्यानंतर सगळा प्रकार समोर

Crime News : एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चौघांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, या कृत्याचा व्हिडिओ बनवून तिला तब्बल सहा महिने ब्लॅकमेल केले. या सततच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली असून, या प्रकरणातील आरोपींमध्ये एका 70 वर्षीय वृद्धाचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : रात्री बारा वाजता चिमुकलीला तेल, कुंकू लावलं अन् देवासमोर उभं करुन कुऱ्हाडीने मुंडकं छाटलं; सावत्र आईने का घेतला जीव?

बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार

पीडितेचे कुटुंब गावाजवळील एक आंब्याची बाग सांभाळण्याचे काम करते. सहा महिन्यांपूर्वी पीडितेचे वडील मजुरीसाठी गेले होते आणि आई जेवण बनवण्यासाठी घरी गेली होती. यावेळी संधी साधून तहजीब नावाच्या आरोपीने बागेत घुसून मुलीला बंदुकीचा धाक दाखवला आणि शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ दाखवून तिला धमकावण्यास सुरुवात केली.

आईने विचारल्यानंतर पीडितेने सांगितला धक्कादायक प्रकार

या घटनेच्या चार दिवसांनंतर, मुख्य आरोपी तहजीबने त्याचे साथीदार आलम, कल्लू आणि एका अज्ञाताला बोलावले. या चौघांनी मिळून पीडितेवर सामूहिक बलात्कार केला आणि कोणाला सांगितल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. गेल्या सहा महिन्यांपासून हे नराधम तिला सतत ब्लॅकमेल करत अत्याचार करत राहिले. पीडितेची प्रकृती खालावल्याने जेव्हा तिची आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली, तेव्हा ती गरोदर असल्याचे समोर आले. आईने विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर पीडितेने आपला सर्व प्रकाराची माहिती दिली.

हे ही वाचा : दोन महिन्यांच्या तान्हुल्याचा रडण्याचा आवाज आला, आईने तोंडात बोळा कोंबून पेटत्या चुलीत फेकलं!

70 वर्षीय वृद्धाचा समावेश

पोलिसांनी सांगितले की, तहजीब, आलम आणि 70 वर्षीय कल्लू यांच्यासह एका अज्ञातावर सामूहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 70 वर्षीय वृद्धाचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. सध्या पोलीस आरोपींच्या अटकेसाठी ठिकठिकाणी छापेमारी करत असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
 

    follow whatsapp