शेजारी राहणाऱ्या पुरुषासोबत महिलेचे अनैतिक संबंध... दोघांमध्ये वाद अन् आरोपीने थेट माय-लेकीचा जीव घेतला!

आरोपी तरुण पेशाने अकाउंटंट असून मृत महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. मात्र, त्यांच्यात सतत वाद सुरू झाल्याने त्याने आधी संबंधित महिलेची हत्या केली आणि नंतर निर्दोष मुलीलाही ठार मारलं. दोघींच्या हत्येनंतर त्यांचे मृतदेह बेड बॉक्समध्ये लपवून तो घटनास्थळावरून फरार झाला.

दोघांमध्ये वाद अन् थेट माय-लेकीचा जीव घेतला!

दोघांमध्ये वाद अन् थेट माय-लेकीचा जीव घेतला!

मुंबई तक

• 01:32 PM • 26 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

शेजारी राहणाऱ्या पुरुषासोबत महिलेचे अनैतिक संबंध...

point

दोघांमध्ये वाद अन् आरोपीने थेट माय-लेकीचा जीव घेतला!

Crime News: दिल्लीच्या सरिता विहार परिसरात घडलेल्या एका दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अली विहार परिसरात असलेल्या एका घरातील पलंगात आई आणि तिच्या लहान मुलीचा मृतदेह आढळला. या घटनेनंतर, चार-पाच दिवसांनी पोलिसांनी प्रकरणाचा उलगडा करत आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या शेजारच्या व्यक्तीने ही निर्घृण हत्या केली. 

हे वाचलं का?

बेड बॉक्समध्ये पत्नी आणि मुलीचा मृतदेह 

35 वर्षीय ज्योती आणि तिची 6 वर्षांची मुलगी अशी मृतांची ओळख समोर आली आहे.  ज्योती तिच्या पती सुदर्शनसोबत अली विहारमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होती. 20 फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास सुदर्शन घरी पोहोचला, तेव्हा त्याची पत्नी आणि मुलगी दोघीही गायब होत्या, तसेच त्यांच्या खोलीत सामान अस्ताव्यस्त अवस्थेत होते. त्यावेळी, संशय आल्यानंतर पतीने बेड बॉक्स उघडला आणि त्यात तिला त्याची पत्नी आणि मुलीचा मृतदेह आढळला. 

हे ही वाचा: जालना: आधी झाडाखाली, नंतर ढाब्यावर... 5 जणांकडून भोळसर महिलेवर सामूहिक अत्याचार! न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

प्रकरणाची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा तपास सुरू केला. प्राथमिक तपासात दोघींची गळा दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन क्राइम टीम आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना घटनास्थळी बोलवण्यात आले. दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांचा संशय त्याच इमारतीत राहणाऱ्या 35 वर्षीय दीनदयाल नावाच्या तरुणावर गेला. संबंधित तरुण हा मृत महिलेचा भाचा असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर तो फरार झाला होता आणि त्याचा मोबाइलही बंद असल्यामुळे त्याच्यावरील संशय आणखी वाढत गेला. पोलिसांनी आरोपीच्या शोधात बऱ्याच ठिकाणी छापे टाकले. 

हे ही वाचा: कल्याण: "आई-बाबा त्रास करून घेऊ नका..." बारावीच्या परीक्षेच्या भितीने 17 वर्षीय विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य!

आरोपीचे महिलेसोबत संबंध... 

आरोपी तरुण पेशाने अकाउंटंट असून मृत महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. यादरम्यान, त्यांच्यात अनेकदा वाद व्हायचे. महिलेच्या कथित पजेसिव्ह वर्तनामुळे आरोपी वैतागला होता आणि याच गोष्टीमुळे संतापलेल्या आरोपीने रागाच्या भरात हा भयंकर गुन्हा त्याने केला. त्याने आधी संबंधित महिलेची हत्या केली आणि नंतर निर्दोष मुलीलाही ठार मारलं. दोघींच्या हत्येनंतर त्यांचे मृतदेह बेड बॉक्समध्ये लपवून तो घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी तांत्रिक सर्व्हिलन्स आणि सततच्या छाप्यांच्या मदतीने त्याची लोकेशन ट्रॅक केली आणि शेवटी त्याला अटक केली. आता आरोपीची कठोर चौकशी करून प्रकरणाचा तपास केला जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि आरोपीच्या चौकशीतून आणखी खुलासे होऊ शकतात. 

    follow whatsapp