बुलढाणा : मित्राच्या मदतीने भावाला संपवलं, पुरावा नष्ट करण्यासाठी शेतात जाळला मृतदेह

मुंबई तक

27 Feb 2026 (अपडेटेड: 27 Feb 2026, 01:43 PM)

Buldhana Crime : बुलढाण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने आपल्या धाकट्या भावाची निर्घृणपणे हत्या केली. नंतर मित्राच्या मदतीने मृतदेह एका शेतात जाळला. पोलिसांनी खुनी भाऊ आणि त्याच्या मित्राला अटक केली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात हत्येचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Buldhana crime

Buldhana crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

भावाच्या डोक्यावर रॉडने हल्ला आणि  मृतदेह शेतात जाळला

point

बुलढाण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस

Buldhana Crime : जका खान - बुलढाण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने आपल्या धाकट्या भावाची निर्घृणपणे हत्या केली. नंतर मित्राच्या मदतीने मृतदेह एका शेतात जाळला. पोलिसांनी खुनी भाऊ आणि त्याच्या मित्राला अटक केली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात हत्येचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : हिंगोली : आधी चक्कर आणि उलट्या, नंतर तापाने फणफणून दोघांचा दुर्दैवी मृत्यू, गावात भीतीचे वातावरण

नेमकं काय घडलं? 

घडलेल्या घटनेनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तहसीलमधील राहुड गावातील शेतात जळालेल्या मृतदेहाची माहिती ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. अधिकाऱ्याने तत्काळपणे पिंपळगाव राजा पोलिसांना कळवले. पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्याचदरम्यान एक कुत्राही आणण्यात आला. 

भावाच्या डोक्यावर रॉडने हल्ला आणि  मृतदेह शेतात जाळला

पोलिसांनी मृताचा भाऊ चेतन संजय इंगळे (वय 35) याची चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीनंतर त्याने सांगितलं की, एका मित्राच्या मदतीने त्याने दुपारी 1:30 वाजता त्याच्या धाकट्या भावाच्या डोक्यावर रॉडने हल्ला करत त्याची हत्या केली आणि नंतर मृतदेह त्यांच्याच शेतात जाळला. 

हे ही वाचा : वहिनीची विटेने ठेचून निर्घृण हत्या... हत्येनंतर, दिराने 25 फुटावरुन मारली उडी; दिराच्या भयंकर कृत्यमागचं कारण काय?

पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याचे स्टेशनचे हाऊस ऑफिसर भागवत मुळिक यांनी बोलताना सांगितले की, खुनी भाऊ आणि त्याचा साथीदार मित्राला अटक केली आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला, या हत्येमागील नेमका हेतू काय याबाबत त्यांची चौकशी केली जाईल.