Crime News : बायकोच्या आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून एका 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी त्याने एक व्हिडिओ बनवला. या व्हिडिओत त्याने आपल्या मृत्यूला पत्नी आणि तिचे नातेवाईक जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. गेल्या दीड वर्षांपासून पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने या व्हिडिओमध्ये नमूद केले आहे. उत्तर प्रदेशातील ललितपूर परिसरातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नागपूर : 8 वर्षांच्या लेकीला बाप दाखवायचा पोर्न, नंतर नको तेच... कोणाला सांगितल्यास द्यायचा 'ती' धमकी
पैशांसाठी बायकोने छळले
रामप्रसाद असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलवर 1 मिनिट 15 सेकंदाचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. यामध्ये त्याने आपला वेदनादायक प्रवास मांडला आहे. 'गेल्या दीड वर्षांपासून मी पत्नीसोबत कायदेशीर लढाई लढत आहे. सासरच्या लोकांनी मला मानसिकदृष्ट्या इतके छळले आहे की, आता ते सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे,' असे त्याने भावूक होत सांगितले. सासरच्या मंडळींनी त्याच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केल्याचा आणि पैसे न दिल्यास हुंड्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही त्याने या व्हिडिओत केला आहे.
'...त्यामुळे मी आत्महत्या करत आहे'
व्हिडिओमध्ये रामप्रसादने आपल्या आर्थिक हतबलतेचाही उल्लेख केला आहे. तो म्हणाला की, त्याच्याकडे ना पैसे आहेत ना नोकरी. तो एक सुशिक्षित तरुण असून, या छळामुळे आणि धमक्यांमुळे त्याचे करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. सासरच्यांकडून सतत होणारा अपमान आणि ब्लॅकमेलिंगमुळे तो प्रचंड तणावात होता. 'माझी नोकरी लागण्याची आता कोणतीही आशा उरली नाही, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे,' असे सांगत त्याने विष प्राशन केले. या व्हिडिओने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : पुणे : कर्जात बुडालेल्या बिझनेसमनने केली बायकोची हत्या, ब्लँकेटने तोंड दाबून संपवलं अन् स्वत:च केला पोलिसांना फोन
लवकरच लोकोपायलट होणार होता
मृताच्या भावाने सांगितले की, त्याचा भाऊ अभ्यासात खूप हुशार होता. त्याने आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो आता आयआयटी रुकडी येथून ऑनलाईन डिप्लोमाचं शिक्षण घेत होता. त्याने रेल्वेच्या लोकोपायलटची परिक्षा देखील पास केली होती. त्याची फक्त शारीरिक चाचणी बाकी होती. मात्र त्याच्या पत्नीने आणि सासरकडच्या मंडळींनी त्याला खूप छळलं. यामुळेच त्याने आत्महत्या केली.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृत रामप्रसादचा मोबाईल फोन ताब्यात घेतला असून तो फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस सर्व बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत. रामप्रसादच्या कुटुंबावर या घटनेमुळे शोककळा पसरली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
ADVERTISEMENT











