Mallikarjun Kharge: काँग्रेस जिंकली तर मालमत्ता, मंगळसूत्र हिसकावून घेईल? Exclusive मुलाखतीत खरगेंचं नेमकं उत्तर

मिलिंद खांडेकर, मॅनेजिंग एडिटर

27 Apr 2024 (अपडेटेड: 27 Apr 2024, 03:15 PM)

Mallikarjun Kharge Interview: 'ही निवडणूक काँग्रेस जिंकल्यास लोकांची मालमत्ता हिसकावून, मंगळसूत्र हिसकावून मुस्लिमांना देईल, असा आरोप भाजप नेतृत्व करत आहे.' ज्याला मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संपत्ती, मंगळसूत्र.. यावर नेमकं काय म्हणाले खरगे?

संपत्ती, मंगळसूत्र.. यावर नेमकं काय म्हणाले खरगे?

follow google news

Mallikarjun Kharge Interview on Mangalsutra: नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2024 ही (Lok Sabha Election 2024) देशात सर्वार्थाने चर्चेत आहे. सध्या देशभरात या एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे. आतापर्यंत मतदानाचे दोन टप्पे पार पडले आहेत. असं असतानाच भाजपने आता काँग्रेसविरोधात तीव्र राजकीय हल्ले सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने ही निवडणूक काँग्रेस जिंकल्यास लोकांची मालमत्ता हिसकावून, मंगळसूत्र हिसकावून मुस्लिमांना देईल, असा आरोप केला आहे. यावर काँग्रेसनेही जोरदार पलटवार केला असून भाजपचे नेते पराभवाच्या भीतीने घाबरून काहीही बोलत असल्याचं म्हटले आहे. आता याचबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी न्यूज Tak ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत नेमकं उत्तर दिलं आहे. 

हे वाचलं का?

या मुलाखतीत मल्लिकार्जुन खरगे यांनी असं म्हटलं आहे की, 'अलीकडेच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे वेळ मागितला होता, त्यांना आम्हाला खरोखरच काँग्रेसचा जाहीरनामा दाखवून त्यात नेमकं काय लिहलं आहे याबाबत सत्य दाखवायचं आहे.'

हे ही वाचा>> अमेठी-रायबरेलीतून राहुल-प्रियांका लढणार? खरगेंचं मोठं विधान

इंडिया टुडे ग्रुपच्या Tak क्लस्टरचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे. न्यूज Tak च्या विशेष  मुलाखतीत खरगे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या प्रत्येक आरोपांना सविस्तर उत्तर दिले आहे.

राहुल गांधींनी घाबरून अमेठी सोडलं की निवडणूक लढवणार, प्रियांका गांधी रायबरेलीवरून लढणार?

उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या जागांवरही भाजप सातत्याने हल्ला करत आहे. या दोन्ही जागा समाजवादी पक्षासोबतच्या इंडिया आघाडीतील जागावाटपमध्ये काँग्रेसकडे आहेत. राहुल गांधी यांचा 2019 च्या निवडणुकीत अमेठीमधून स्मृती इराणी यांच्याकडून पराभव झाला होता. तर सोनिया गांधी या राज्यसभेवर निवडून गेल्याने रायबरेलीची जागाही रिक्त आहे. 

अशावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. अखेर, अनेक दशकांपासून गांधी घराण्याच्या ताब्यात असलेल्या या जागांवर काँग्रेसने एवढा सस्पेन्स का ठेवला आहे? पराभवाच्या भीतीने पळून जाण्यासारख्या विरोधकांच्या आरोपांमध्ये किती ताकद आहे? काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनीही त्यांच्या मुलाखतीत या प्रश्नावर सविस्तर बोलत राहुल-प्रियांका यांच्याबाबत मोठे संकेत दिले आहेत.

हे ही वाचा>> LIVE : 'आम्ही काम करतो, इतरांसारखं...', अजित दादांची सुळेंवर टीका

उत्तर-दक्षिण वादाला खतपाणी घालणाऱ्या खासदारावर कारवाई का झाली नाही? काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जुनी पेन्शन योजनेचे आश्वासन का समाविष्ट केले नाही? असे काही गुंतागुंतीचे प्रश्नही मल्लिकार्जुन खरगे यांना या मुलाखतीत विचारण्यात आले. ही संपूर्ण मुलाखत तुम्हाला रात्री 8.30 वाजता  मुंबई Tak च्या अधिकृत YouTube चॅनलवर सविस्तरपणे पाहता येईल.

    follow whatsapp