"डॉक्टरचा नर्ससोबतचा 'तो' व्हिडीओ..." रुग्णालयातील स्टाफने रचला मोठा कट अन् तब्बल 90 लाखांची मागणी

एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सिंग स्टाफने डॉक्टरला ब्लॅकमेल केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. रुग्णालयाच्या संचालकाला व्हॉट्सअॅप कॉल करण्यात आला आणि त्यांच्याकडून 90 लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

"डॉक्टरचा नर्ससोबतचा 'तो' व्हिडीओ..."

"डॉक्टरचा नर्ससोबतचा 'तो' व्हिडीओ..."

मुंबई तक

• 03:53 PM • 19 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

"डॉक्टरचा नर्ससोबतचा 'तो' व्हिडीओ..."

point

रुग्णालयातील स्टाफने रचला मोठा कट

point

डॉक्टरकडे तब्बल 90 लाखांची मागणी

Crime News: राजस्थानच्या भीलवाडा शहरात एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सिंग स्टाफने डॉक्टरला ब्लॅकमेल केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. रुग्णालयाच्या संचालकाला व्हॉट्सअॅप कॉल करण्यात आला आणि त्यांच्याकडून 90 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. आरोपानुसार, पीडित डॉक्टरचा एका नर्ससोबतचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी आता या प्रकरणात पीडित डॉक्टरांच्या तक्रारीवरून, रुग्णालयात काम करणाऱ्या दोन नर्सिंग स्टाफ आणि दोन हेल्पर्सना अटक केल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

डॉक्टरकडे 90 लाख रुपयांची मागणी

भीलवाडा शहरातील सुभाषनगर पोलीस स्टेशनच्या अधिकऱ्यांनी प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, शहरातील एका खाजगी रुग्णालयातील स्टाफने नर्सिंग कर्मचाऱ्यांमार्फत डॉक्टरला ब्लॅकमेल केलं. नर्ससोबतचा एक व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत डॉक्टरकडे 90 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट... मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल! कधीपासून होणार लागू?

पोलीस तपासात आलं समोर... 

पीडित डॉक्टरच्या तक्रारीच्या आधारे, गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर टीमच्या मदतीने प्रकरणाचा तपास केला जात आहे. एका महिलेच्या फोन नंबरवरून डॉक्टरला धमकी देण्यात आल्याचं तपासात समोर आलं. जेव्हा त्या महिलेची चौकशी करण्यात आली तेव्हा तो नंबर तिचा नसल्याचं तिने सांगितलं. खरं तर, महिलेच्या नावाने असलेला तो नंबर हॉस्पिटलबाहेर असलेल्या एका चहाच्या टपरीच्या मालकाचा होता. 

हे ही वाचा: Govt Job: रेल्वेत पुन्हा 5000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती! कोणत्याही परीक्षेशिवाय होणार निवड...

संबंधित मोबाईल नंबरवरून रुग्णालयाच्या मालकाला धमकी देण्यात आली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. धमक्या देणारे दोन पुरुष नर्सिंग स्टाफ आणि रुग्णालयात काम करणारे दोन हेल्पर्स असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यांना अटक करण्यात आली असून सर्वांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अटक केलेल्या आरोपींजवळ कोणता व्हिडीओ आहे? हे तपासानंतरच स्पष्ट होईल. तसेच, मोबाईलमध्ये संबंधित व्हिडीओ आढळल्यास त्याचा देखील तपास केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

    follow whatsapp