घराजवळ शौचास बसला होता, घरमालकाने गच्चीवरुन फेकून मारली फरशी, तरुणाचा मृत्यू; मृतदेह रस्त्यावर ठेऊन नागरिकांनी केला रास्ता रोको

मुंबई तक

18 Feb 2026 (अपडेटेड: 18 Feb 2026, 05:31 PM)

Crime news : एका क्षुल्लक वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शौचास बसल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका घरमालकाने गच्चीवरून ग्रेनाइटची टाइल्स फेकून मारली. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला होता. चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात संतापाची लाट उठली आहे. घरमालकावर कारवाी व्हावी यासाठी नागरिकांनी रास्ता रोको केला.

Crime news

Crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

घराजवळ शौचास बसला होता

point

घरमालकाने गच्चीवरुन फेकून मारली फरशी

point

तरुणाचा मृत्यू

Crime news : एका क्षुल्लक वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शौचास बसल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका घरमालकाने गच्चीवरून ग्रेनाइटची टाइल्स फेकून मारली. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला होता. चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात संतापाची लाट उठली आहे. घरमालकावर कारवाी व्हावी यासाठी नागरिकांनी रास्ता रोको केला. बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. अजित कुमार असं मृत तरुणाचं नाव आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : नागपूर : पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, नवऱ्याने अल्पवयीन मुलावर त्याच्या मित्राला अत्याचार करायला भाग पाडलं

शौचाला बसल्याने राग

अजित कुमार आपल्या एका मित्रासोबत आदर्श नगरमधील एका फायनान्स कंपनीत कामासाठी गेला होता. यादरम्यान तो जवळच असलेल्या एका घराच्या कडेला शौचास बसला. हे पाहून घरमालक शंभू झा संतापला आणि त्याने रागाच्या भरात घराच्या गच्चीवरून ग्रेनाईटचा जड तुकडा खाली फेकला. हा तुकडा थेट अजितच्या डोक्याला लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर गंभीर प्रकृतीमुळे पाटण्याला हलवण्यात आले होते.

घरमालकावर कठोर कारवाईसाठी रास्ता रोको

तरुणाच्या मृत्यूची बातमी समजताच संतप्त नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी समस्तीपूर-पाटणा मुख्य मार्ग रोखून धरला. मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलकांनी टायर जाळून जोरदार निदर्शने केली. आरोपी घरमालकावर कठोर कारवाई करावी, एफआयआर दाखल करावा आणि पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करत आंदोलकांनी रस्ता जाम केला. यामुळे अनेक तास वाहतुकीची मोठी कोंडी झाली आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

हे ही वाचा : केबिनमध्ये बोलवून विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे, नामांकित शाळेतील प्रकार; मुख्याध्यापकाला पालकांनी दिला चोप

आरोपीचा शोध सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करताना पोलीस आणि नागरिक यांच्यात काही वेळ बाचाबाचीही झाली. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.