Uncle kills Nephew : एका मामाने आपल्या चुलत भाच्याची विळ्याने गळा चिरुन अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. या हत्येमागचं कारण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मामाचे त्याच्या भाच्याच्या बायकोसोबत अनैतिक संबंध होते. त्याच वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : शिक्षिकेसोबतच्या अफेयरला विरोध, शिक्षकाने पत्नीला विजेचा शॉक देऊन संपवले; हादरवून टाकणारं प्रकरण
विळ्याने चिरला गळा
रामपूर जिल्ह्यातील स्वार परिसरातील ही घटना आहे. आरोपी मामाने आपल्याच भाच्याचा लोखंडी विळ्याने गळा चिरून खून केला. या खळबळजनक घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले असून मृताच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून आणि जुन्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
भाच्याच्या बायकोसोबत अनैतिक संबंध
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मामाचे त्याच्याच भाच्याच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. याच कारणावरून कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून तणाव होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपीने मध्यरात्री संधी साधून भाच्यावर जीवघेणा हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी रामपूर जिल्हा रुग्णालयात पाठवला आणि तातडीने कारवाई करत आरोपी नसीम याला बेड्या ठोकल्या.
हे ही वाचा : पॉवरच्या गोळ्या खाऊन राक्षस बनला, गर्लफ्रेंडची हत्या केल्यानंतर मृतदेहावर बलात्कार; पोलीस तपासात मोठे खुलासे
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणाबाबत अपर पोलीस अधीक्षक अनुराग सिंह यांनी सांगितले की, खौद कला गावात अकील नावाच्या तरुणाची गळा चिरून हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कुटुंबीयांच्या चौकशीनंतर मृताच्या मामानेच हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेले शस्त्रही जप्त केले आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झाले नसले तरी, सखोल तपासाअंती सर्व बाबी समोर येतील.
ADVERTISEMENT











