प्रेयसीने धोका दिला अन् प्रियकराने 'असा' बदला घेतला! रात्रीच्या अंधारात तरुणीच्या घरात शिरला अन्...

प्रेयसीने प्रेमात धोका दिल्यामुळे तरुणाने तिच्यासोबत भयंकर कृत्य केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:07 PM • 18 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रेयसीने धोका दिला अन् प्रियकराने 'असा' बदला घेतला!

point

रात्रीच्या अंधारात तरुणीच्या घरात शिरला अन्...

Crime News: बिहारमध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. संबंधित घटना मुजफ्फरपूर जिल्ह्यात घडली असून प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकर थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली असता, प्रेयसीने धोका दिल्यामुळे हा मोठा गुन्हा केल्याचं त्याने सांगितलं. मंगळवारी सकरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. 

हे वाचलं का?

प्रेयसीच्या हत्येनंतर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण

पीडिता 16 वर्षांची अल्पवयीन असून ती 9 वीत शिकत होती. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हत्येनंतर आरोपी स्वत: हातात पिस्तूल घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला आणि आत्मसमर्पण केलं. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: अखेर, UTS अ‍ॅप सेवाबंद... आता तिकीट बुकिंगसाठी 'हे' नवं सुपर अ‍ॅप अनिवार्य

कुटुंबीय गाढ झोपेत असताना प्रेयसीची हत्या 

संबंधित आरोपी हा पीडितेच्या शेजारी राहत असून रात्री उशीरा त्याने प्रेयसीच्या घरात घुसून तिची हत्या केली. घटनेच्या वेळी, तरुणीचे कुटुंबीय गाढ झोपेत होते आणि त्यांना याबाबत काहीच कळलं नाही. घरातील जिन्यावर पीडितेचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला. माहिती मिळताच, परिसरातील लोकसुद्धा घरात गोळा झाले. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. 

हे ही वाचा: अपघाताच्या आदल्या रात्री दादांना फोन केला होता का? प्रफुल्ल पटेल पहिल्यांदाच बोलले, कॉल करण्याचं कारणही सांगितलं

पोलिसांनी दिली माहिती 

आरोपीची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर, आपल्या प्रेयसीने प्रेमात धोका दिला आणि त्यामुळे तिची हत्या केल्याचं प्रियकराने कबूल केलं. पोलिसांनी पीडितेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp