शिक्षिकेसोबतच्या अफेयरला विरोध, शिक्षकाने पत्नीला विजेचा शॉक देऊन संपवले; हादरवून टाकणारं प्रकरण

Primary Teacher Kills Wife : एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाने विजेचा शॉक देऊन पत्नीची हत्या केली आहे. आरोपी शिक्षकाचे एका शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधांना विरोध केल्याने शिक्षकाने ही हत्या केल्याची माहिती आहे. चेतना असं मृत महिलेचं नाव आहे.  याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

Primary Teacher Kills Wife

Primary Teacher Kills Wife

मुंबई तक

19 Feb 2026 (अपडेटेड: 19 Feb 2026, 12:28 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिक्षिकेसोबतच्या अफेयरला विरोध

point

शिक्षकाने पत्नीला विजेचा शॉक देऊन संपवले

point

हादरवून टाकणारं प्रकरण

Primary Teacher Kills Wife : एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाने विजेचा शॉक देऊन पत्नीची हत्या केली आहे. आरोपी शिक्षकाचे एका शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधांना विरोध केल्याने शिक्षकाने ही हत्या केल्याची माहिती आहे. चेतना असं मृत महिलेचं नाव आहे.  याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : बहिणीची निर्घृण हत्या अन् नंतर फाशी घेऊन भावाची आत्महत्या... नेमकं कारण काय?

नोकरी मिळाल्यानंतर वागण्यात बदल

उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील ही घटना आहे. चेतनाचा विवाह 2014 मध्ये उमाकांत शुक्ला याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही वर्षांनी उमाकांतला प्राथमिक शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. या दाम्पत्याला सहा वर्षांचा मुलगाही आहे. मात्र, नोकरी मिळाल्यानंतर उमाकांतच्या वागण्यात बदल झाला आणि तो पत्नीचा छळ करू लागला, असा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे.

शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध

मृत चेतनाच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, उमाकांतचे एका प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षिकेसोबत गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. चेतना या संबंधांना सतत विरोध करत असे आणि याबाबत तिने आपल्या माहेरच्या लोकांनाही माहिती दिली होती. याच वादातून रागाच्या भरात पतीने चेतनाच्या अंगाला विजेच्या तारा लावून शॉक दिला आणि तिची हत्या केली.

हे ही वाचा : 50 वर्षीय अनिलचे मेहुण्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध! नाराज प्रेयसीला मनवण्यासाठी गेला पण नकार मिळताच...

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणाबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पतीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच कायदेशीर कारवाई पूर्ण केली जाईल.
 

    follow whatsapp