Crime News: एका तरुणाने आपल्या मावस बहिणीची हत्या करून नंतर स्वत: फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही जोधपूरच्या यूआयटी कॉलनीतील गायत्री नगरमध्ये घडली असून यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी, दोघांचे भयंकर अवस्थेतील मृतदेह पाहून त्यांना देखील धक्का बसला. नंतर, दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि पोस्टमॉर्टम तपासणीसाठी ते रुग्णालयात नेण्यात आले.
ADVERTISEMENT
बहिणीची हत्या अन् नंतर फाशी घेऊन आत्महत्या..
भगवती अशी पीडित तरुणीची ओळख समोर आली असून तो बीएसटीसीची ट्रेनिंग करत होती. तसेच, शिक्षणासाठी ती पालीतील एका हॉस्टेलमध्ये राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, ती नुकतीच तिच्या घरी आली होती. तिच्यासोबत घडलेल्या या घटनेने कुटुंबीय अजूनही मोठ्या धक्क्यात आहेत. घरी वाद झाल्याचं वृत्त असून हे प्रकरण इतकं टोकाला पोहोचलं की तिचा मावस भाऊ कैलाश याने भगवतीवर जड लोखंडी वस्तूने हल्ला केला आणि या भयानक हल्ल्यात तिची जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा: 50 वर्षीय अनिलचे मेहुण्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध! नाराज प्रेयसीला मनवण्यासाठी गेला पण नकार मिळताच...
सुसाईड नोटमध्ये काय सापडलं?
बहिणीच्या हत्येनंतर, कैलाशने स्वत: फाशी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. पोलिसांना घटनास्थळी एका सुसाईड नोटचे फाटलेले तुकडेही सापडले. मात्र, या कागदाच्या तुकड्यांमधील लिहिलेली माहिती अद्याप समोर आली नाही. आता, पोलिस ते तुकडे एकत्र करून त्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे ही वाचा: "सूनेत्राताईंना राष्ट्रवादीच्या अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांच्या सह्या, उर्वरित आमदार कोण आहेत?"
याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचा सर्व बाजूंनी तपास केला जात असून हा वाद कोणत्या कारणावरून झाला आणि तरुणाने अचानक हा मोठा गुन्हा का केला? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलीस कुटुंबीय आणि आसपासच्या लोकांची चौकशी करत आहेत. तसेच, मोबाईल फोन आणि इतर वैयक्तिक गोष्टींचा देखील तपास केला जात असून या घटनेने स्थानिकांमध्ये गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतंय.
ADVERTISEMENT











