Crime News : नवरा आणि बायकोच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने आपल्याच बायकोचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी पतीला पोर्न पाहण्याचे व्यसन जडले होते. त्याच व्यसनाच्या आहारी जाऊन त्याने पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पत्नीकडून हुंडा उकळण्याचा त्याचा डाव होता. मात्र पत्नीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. अटक होण्याच्या भीतीने आरोपी पती मुंबईत येऊन लपला होता. यानंतर पुढे काय झालं जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सध्या घटस्फोटाचं प्रमाण का वाढतंय? प्रेमानंद महाजारांनी दिलं उत्तर...
हुंड्यासाठी दबाव
मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचा विवाह 10 मे 2025 रोजी शिवम साहू याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच हुंड्याच्या मागणीवरुन पतीने तिचा छळ सुरु केला. पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, लग्नाच्या वेळी सुमारे 3 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 2 लाख रुपये दिले होते, पण उर्वरित रकमेसाठी पती सातत्याने दबाव टाकत होता.
अटकेच्या भीतीने गाठली मुंबई
पीडितेने आरोप केला आहे की, डिसेंबर 2025 मध्ये आरोपीने तिचा एक खासगी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियासह नातेवाइकांनाही पाठवला. जेव्हा महिलेने याला विरोध केला, तेव्हा आरोपीने तिला बदनाम करण्याची धमकी दिली. पोलीस तपासात असेही समोर आले आहे की, आरोपीला इंटरनेटवर आक्षेपार्ह साहित्य पाहण्याचे व्यसन होते. व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर तो अटकेच्या भीतीने मुंबईत येऊन लपला होता.
हे ही वाचा : पॉवरच्या गोळ्या खाऊन राक्षस बनला, गर्लफ्रेंडची हत्या केल्यानंतर मृतदेहावर बलात्कार; पोलीस तपासात मोठे खुलासे
घेराबंदी करुन आरोपीला अटक
12 फेब्रुवारी रोजी आरोपी शस्त्रासह आपल्या सासरी मऊगंज भागात पोहोचला आणि कुटुंबाला धमकावू लागला. याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घेराबंदी करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध हुंडाबळी, धमकी आणि खाजगी व्हिडिओ व्हायरल करणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून पीडितेचा कायदेशीर बचाव केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT











